शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

राष्ट्रसंत भैय्युजी महाराजांचे कार्य दिपस्तंभासारखे : सानंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 2:21 PM

भैयुजी महाराजांचे कार्य हे दिपस्तंभासारखे आहे असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. 

ठळक मुद्दे५ जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डमध्ये भैयुजी महाराजांचा अस्थिकलश भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. महाराजांच्या चाहत्यांसाठी ऋषीसंकुल सजनपुरी येथे प.पु.भैयुजी महाराजांचे स्मृतीस्थळ बांधण्यात आले.

खामगांव : राष्ट्रसंत भैयुजी महाराज हे अध्यात्मिक गुरु होते. शेतक-यांना केंद्रबिंदु माणुन त्यांनी अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविले. सत्संग,अध्यात्मासोबतच विज्ञानाची जोड घालुन त्यांनी हजारो शेतकरी, आदिवासी, युवक, महिला भगिणी यांचे जिवनमान  उंचाविले. त्यांचे व्यक्तीमत्व नेहमीच उर्जा प्रदान करणारे होते. भैयुजी महाराजांनी  आपल्या आयुष्यात सदैव सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. अनेकांना जिवन जगण्याचा मंत्र त्यांनी दिला. भैयुजी महाराजांचे कार्य हे दिपस्तंभासारखे आहे असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. ५ जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डमध्ये भैयुजी महाराजांचा अस्थिकलश भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी खामगांव कृषी उत्पन्न बाजार समिती व सुर्योदय परिवाराच्या वतीने  आयोजित सामुहिक श्रध्दांजलीपर कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला सभापती संतोष टाले, ऋषी संकुल आश्रमचे अध्यक्ष एन.टी.देशमुख, सुर्योदय परिवाराचे विर प्रतापजी थानवी, वल्लभरावजी देशमुख, सतीश राठी,विदर्भ कबडड्ी असो.चे अध्यक्ष अशोकबाप्पु देशमुख, देशमुख समाजउन्नती मंडळाचे अध्यक्ष संतोष देशमुख,पत्रकार प्रशांत देशमुख, दगडुजी सरदार, विवेक मोहता आदींची प्रमुख उपस्थिती होती.  पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, शेतक-यांचा उध्दार करण्यासाठी भैयुजी महाराजांनी सौरउर्जा प्रकल्प, शेतक-यांना मोफत बियाणे, खत वाटप, वृक्षारोपण चळवळ यासारखे अनेक उपक्रम राबविले. खामगांव मतदार संघातील प्रत्येक विकासकामामध्ये भैयुजी महाराजांचा आशिर्वाद व त्यांची समर्थसाथ नेहमीच मिळाली. खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतक-यांसाठी अनेक कार्यक्रमात भैयुजी महाराजांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन व प्रबोधन केले. सर्व समाज बांधव एका झेंडयाखाली यावा  यासाठी  भैयुजी महाराजांनी ऋषीसंकुल सजनपुरी येथे अनेक वर्षे सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळयाचे यशस्वीरित्या आयोजन केले. भैयुजी महाराज जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी केलेले कार्य सदैव विधायक कायार्ची प्रेरणा देणारे आहे.महाराजांचे अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी सदैव सुर्योदय परिवाराच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. ऋषीसंकुल सजनपुरीचे अध्यक्ष एन.टी.देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भैयुजी महाराजांनी अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविले. भैयुजी महाराजांच्या प्रत्येक  उपक्रमाला सानंदा साहेबांनी समर्थ साथ दिली.  भैयुजी महाराज हे उपकाराची जाणीव ठेवणारे होते. भैयुजी महाराजांच्या आकस्मीक निधनाने सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे व्यक्तीमत्व आपण गमावले आहे.ऋषी संकुल सजनपुरी येथे महाराजांनी सुरु केलेले दत्त जयंती, नवरात्री, गुरु पोर्णिमा  हे उपक्रम आपण भविष्यातही सुरु ठेवणार आहोत. महाराजांचा पुण्यतिथी उत्सव सुध्दा आयोजित करु.   महाराजांच्या चाहत्यांसाठी ऋषीसंकुल सजनपुरी येथे प.पु.भैयुजी महाराजांचे स्मृतीस्थळ बांधण्यात आले असुन येथे महाराजांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुर्योदय परिवाराच्या वतीने विर प्रताप थानवी, वल्लभरावजी देशमुख, कृ.उ.बा.स.च्या वतीने सभापती संतोष टाले यांनी, अडते व्यापारी असो.चे प्रतिनिधी म्हणुन विवेक मोहता यांनी, हमाल-मापारी संघटनेच्या वतीने दगडुजी सरदार यांनी तर पत्रकार बांधवांच्या वतीने पत्रकार प्रशांत देशमुख यांनी प.पु.भैयुजी महाराजांना आपली भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

टॅग्स :khamgaonखामगावBhayyuji Maharajभय्यूजी महाराज