शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

अपघातात नवरदेव-नवरी गंभीर; रेल्वेच्या धडकेत एक युवती ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 1:43 AM

मलकापूर : अकोला येथून विवाह सोहळा आटोपून मलकापूरकडे परतणार्‍या  नवरदेवाच्या गाडीला शुक्रवारी रात्री अपघात झाला. त्यात  नवरदेव-नवरी  गंभीर जखमी झाले. तर दुसर्‍या घटनेत शनिवारी पहाटे तालु्क्यातील बहापुरा  येथे रेल्वे रुळ ओलांडताना एक युवती ठार तर तिची चुलत बहीण जखमी  झाली. 

ठळक मुद्देशुक्रवार ठरला अपघात वार

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : अकोला येथून विवाह सोहळा आटोपून मलकापूरकडे परतणार्‍या  नवरदेवाच्या गाडीला शुक्रवारी रात्री अपघात झाला. त्यात  नवरदेव-नवरी  गंभीर जखमी झाले. तर दुसर्‍या घटनेत शनिवारी पहाटे तालु्क्यातील बहापुरा  येथे रेल्वे रुळ ओलांडताना एक युवती ठार तर तिची चुलत बहीण जखमी  झाली. मलकापुरातील शिवाजी नगर भागातील रहिवाशी तथा पालिका कर्मचारी  सदाशिव तायडे यांचा मुलगा दीपक याचा विवाह अकोला येथील  जठार पेठमध्ये राहणारे बळवंतराव आपोतीकर यांची कन्या रेणू हिच्याशी २३  नोव्हेंबरला पार पडला. विवाहाचे सोपस्कार आटोपून नवरदेव नवरी स्वीफ्ट डिझायर या गाडीने  मलकापूरकडे निघाले. पहाटे १.२0 वाजेच्या सुमारास अकोल्यावरून मलका पूरकडे येत असताना विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव वेगातील टाटा इंडिका  (क्र.एम.एच.३0 एल.७७१४ ) स्वीफ्ट डिझायर गाडीवर चालकाच्या बाजूने  जोरदार आदळली.यामध्ये दीपकच्या नाकावर आणि रेणूच्या शरीराला जबर मार लागला. त्यामुळे  दोघेही गंभीररीत्या  जखमी झाले आहेत.यावेळीे नाशिक पोलिसांची गाडी  जात होती. त्यातील कर्मचार्‍यांनी  वाहनातील  नवरेदव-नवरीला अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात  आले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात  हलविण्यात आले.  दीपक आणि रेणू हे दोघेही जखमी झाल्याने २४ नोव्हेंबरचा स्वागत समारंभही  रद्द करण्यात आला.  

रेल्वेच्या धडकेत  एक युवती ठार, दुसरी जखमीबहापुरा : येथील राणी सदाशिव शितोळे (वय १७) व कोमल गजानन शितोळे  (वय १६) या चुलत बहिणी शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास रेल्वे रुळ  ओलांडत होत्या. एक गाडी थोड्या अंतरावर असल्याने रेल्वे रुळ ओलांडला;  मात्र पाठीमागून दुसरी गाडी भरधाव आल्याने दोन्ही बहिणी या दोन गाड्यांच्या  मध्ये सापडल्या. त्यात जोराची हवा आल्याने डाव्या कानाच्या बाजुने जबर  फटका बसल्याने कोमल गजानन शितोळे खाली गिट्टीवर रक्ताच्या थारोळ्यात  पडली तर दुसरीदेखील खाली पडल्याने राणी सदाशिव शितोळे हिच्या पाठीवर  जबरदस्त मार लागला. घटनास्थळी पोहोचून रामराव शितोळे, नगराध्यक्ष अँड.  हरीश रावळ, गजानन ठोसर तथा इतरांनी दोघींना मलकापूर येथे  उपचारार्थ  हलविले. डोक्याला मार लागल्याने कोमल शितोळे हिला बुलडाणा येथे  हलविण्यात आले; मात्र वाटेतच तिची प्राणज्योत मावळली. तर पाठीला गंभीर  मार लागून पोटात रक्ताच्या गाठी तयार झाल्याने कोलते हॉस्पिटलमध्ये डॉ.  अरविंद कोलते यांनी तिच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया केली. घटनेची वार्ता कळ ताच जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेंद्र वाडेकर, मनोहर खराडे आदींसह  अनेकांनी कोलते हॉस्पिटल गाठले व शितोळे परिवाराला धीर दिला. जखमी  राणीची प्रकृती आता स्थिर असल्याचे  डॉ. अरविंद कोलते यांनी सांगितले  आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भातनाते करीत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू