शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांना हवा स्वतंत्र विकास निधी

By admin | Updated: January 30, 2015 01:02 IST

लोकमत परिचर्चेत सरपंचांनी मांडल्या समस्या; ग्रामविकासासाठी हवा समन्वय.

बुलडाणा : खासदार, आमदारांना स्वतंत्र निधीची तरतूद केली जाते, मग सरपंचांनाही स्वतंत्र निधी का नको, असा प्रश्न उपस्थित करून सरपंचांचे अधिकार वाढविले; मात्र विविध समित्यांना स्वतंत्र अधिकार देऊन त्यांच्या अडचणीही वाढविल्या आहेत, अशी खंत सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी लोकमत परिचर्चेत व्यक्त करण्यात आली.सरंपच गावाचा प्रमुख आहे; मात्र या प्रमुखाला जेवढे अधिकार दिले आहेत त्याहीपेक्षा त्यांच्या अडचणी वाढविल्या जात आहेत. गावात विविध योजनेखाली असलेल्या समित्या या सरपंचाच्या अधिकार कक्षेबाहेर आहेत. यामध्ये कुठलाही समन्वय नाही. यामुळे सरपंचांना एखादे विकास काम करायचे असेल, तर स्वतंत्र विकास निधी देण्याची गरज परिचर्चेत व्यक्त करण्यात आली. ग्रामपंचायतच्या शिपायाचे वेतन हे पन्नास टक्के शासन व पन्नास टक्के ग्रामपंचायतच्या निधीतून करायचे असते; मात्र गेल्या कित्येक महिन्यात शासनाचा हिस्सा मिळालेलाच नाही. एकीकडे करांची वसुली नाही, तर दुसरीकडे अशा वेतनाचाही प्रश्न निर्माण होतो त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ग्रामपंचायती अधिक सक्षम होणे गरजेच आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या परिचर्चेत जिल्ह्यातील सरपंच मोतीराम खवले (कठोरा), उषा गायकवाड (चिंचपूर), दिनेश गवते (दहीद खुर्द), बळीराम पाटील (टाकळी विरो), शे. सलीम शे. याकुब (मोताळा) व मातोळा येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन मामलकर यांनी सहभाग नोंदवला. *अशा आहेत सूचना-१३ व्या वित्त आयोगाचा निधी एकाच टप्प्यात मिळावा.-प्रत्येक गावासाठी स्वतंत्र ग्रामसेवक असावा.-ग्रामपंचायतच्या संगणक परिचारकांच्या नियुक्तीचा अधिकारी ग्रामसभेला.-बांधकामाचे अंदाजपत्रक हे इंग्रजीऐवजी मराठीतून असावे.-जिल्हा परिषदेच्या मुकाअ यांनी सरपंच, ग्रामसेवकांची संयुक्त बैठक घ्यावी.-ग्रामसभेतील ठरावाची प्रशासनाने तत्काळ अंमलबजावणी करावी.-गौण खनिजाच्या हरासीमधील सर्वाधिक वाटा ग्रामपंचायतला मिळावा.-पंचायत समितीच्या तांत्रिक अधिकार्‍यावर ठरावीक गावांचा भार द्यावा.-सरपंचाचे मानधन वाढविण्याची गरज आहे.