हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला, पेरण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 11:20 AM2021-06-23T11:20:54+5:302021-06-23T11:21:03+5:30

Buldhana News : पेरणी याेग्य क्षेत्रापैकी २८.१८ टक्केच क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्याचे कृषी विभागाची नोंद स्पष्ट करते.

The weather department's forecast was wrong again, sowing stalled | हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला, पेरण्या रखडल्या

हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला, पेरण्या रखडल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात प्रारंभी पावसाने काहीशी संसतधार हजेरी लावली असली तरी मधल्या काळात पुन्हा दडी मारल्यामुळे पेरण्या रखडलेल्या आहे. वर्तमान स्थितीत एकूण पेरणी याेग्य क्षेत्रापैकी २८.१८ टक्केच क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्याचे कृषी विभागाची नोंद स्पष्ट करते. त्यामुळे जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ११.०४ टक्केच पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात १६.४७ टक्के पाऊस पडला होता. त्यामुळे अद्यापही पाच टक्के पाऊस कमी आहे. पडलेला पाऊस हा विखूरलेल्या स्वरुपात पडला आहे. खामगाव, चिखली, मेहकर आणि सिंदखेड राजा या चार तालुक्यांचा अपवाद वगळता अन्यत्र अपेक्षीत अशी पेरणी पावसा अभावी शेतकऱ्यांनी केली नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यावर्षी ७ लाख ३४ हजार १७७.२२ हेक्टरवर पेरणीचे उदिष्ट असून त्यापैकी २ लाख ६ हजार ८८६.१० हेक्टरवरच पेरणी झाली आहे. खतांचासाही साठा उपलब्ध आहे. अपेक्षीत पाऊस पडला नसला तरी शेतकरी पीकांचे जीवनचक्र पाहता पेरणीला प्राधान्य देत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. यावर्षी मृग नक्षत्रात अपेक्षीत पाऊस पडला नाही.

Web Title: The weather department's forecast was wrong again, sowing stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.