शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा शहर ‘व्हिजन डॉक्युमेंट’ चा मार्ग मोकळा

By admin | Updated: January 23, 2015 01:48 IST

पालिकेने केले व्हीजन डॉक्युमेंटचे सादरीकरण; जिल्हाधिकारी यांनी दिली तत्वत: मान्यता.

बुलडाणा : जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या बुलडाणा शहराच्या विकासासाठी नगरपालिकेने तयार केलेल्या व्हीजन डॉक्युमेंटह्ण ला जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्या अध्यक्षतेखाली आज २२ जानेवारी रोजी तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेच्या धर्तीवर बुलडाणा शहराला आगामी ५0 वर्षात भेडसावणार्‍या समस्या लक्षात घेऊन हे व्हीजन डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे. गुजरातमधील वडोदरा येथील एएनजे पॉवर टेक्नॉलॉजी या कन्सलटंट कंपनीने हे व्हीजन डॉक्युमेंट तयार केले आहे. यामध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता, नाल्या, बगीचे, रस्ते, आठवडी बाजार, शहरातील तलाव, तसेच नगरपालिका इमारत अशा विविध मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. या व्हीजन डॉक्युमेंटनुसार विविध योजनांचे जीपीआरएस पद्धतीनेही सादरीकरण जिल्हाधिकार्‍यांसमोर झाले, यावेळी नगराध्यक्ष टी.डी.अंभोरे पाटील, मुख्याधिकारी संजीव ओहळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता सरकटे, बांधकाम विभागाचे अभियंता बाळासाहेब ठेंग आदी उपस्थित होते. या व्हीजन डॉक्युमेंटसंदर्भात मुख्याधिकारी संजीव ओहळ यांनी विविध मुद्यांवर माहिती दिली. शहरासाठी प्रस्तावित असलेल्या योजनांचा समावेश केंद्र, राज्य तसेच जिल्हा विकास समितीमधील आराखड्यात करावा लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून पालिका प्रशासनाला सूचना केल्या आहेत. यासंदर्भात मुख्याधिकारी ओहळ यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शहराचा कायापालट करणारे हे नियोजन असून, याबाबत लवकरच कार्यमान्यताही अपेक्षित आहे. यासोबतच शहरातील पथदिवे, स्वच्छता अभियान विशेषत: पार्कींगचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.यासंदर्भात जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पालिकेने सादर केलेले व्हीजन डॉक्युमेंट उत्तम असल्याची पुस्ती जोडली. त्या योजनांबाबत आज सादरीकरण झाल्यानंतर तत्वत: मान्यता दिली असून तसेच काही सूचना केल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील यांनी नगरपालिकेने शहराच्या पुढील ५0 वर्षाचा विस्तार लक्षात घेता शहर विकास आराखडा तयार केला असल्याचे सांगून सर्व सदस्य तसेच शहरातील नागरिकांच्या सहकार्याने हा आराखडा पूर्णत्वास नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न पालिकेच्यावतीने केला जाणार असल्याचे सांगीतले.