शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवरातील पापहरेश्वर धारेला पाच वर्षानंतर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 13:51 IST

पापहरेश्वर धारतिर्थला पाणी आल्याने पाहण्यासाठी भाविक, पर्यटन प्रेमी नागरिकांची गर्दी वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: लोणार सरोवरातील पाच वर्षापासून आटलेल्या पापहरेश्वर धारेला पुन्हा पाणी आले असून २६ आॅक्टोबर पासून येथील झरा पुन्हा वाहू लागला आहे. सरोवरातील रामगया झरा हा गेल्या दहा वर्षापासून आटलेला आहे. त्या पाठोपाठ पापहरेश्वर धारही आटली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या धारेला पुन्हा पाणी आले आहे.शासकीय विश्राम गृहापासून सरोवरात पायऱ्यांनी खाली उतरल्यानंतर सुरुवातीलाच हेमाडपंती पश्चिम मुखी रामगया मंदिर दिसते. तीनव्द्वार असलेल्या ह्या मंदिरात रामाची मूर्ती असून बाजूलाच श्रीरामेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराच्या समोरच रामकुंड बुजलेल्या स्थितीत दिसून येतो. थोडे खाली उतरले की, नऊ वर्षापूर्वी अखंड वाहणारा स्वच्छ व शुद्ध पाण्याचा रामगया नावाने प्रसिद्ध असलेला झरा आटलेल्या स्थितीत दिसून येतो. जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर पाहण्यासाठी येणारे देश-विदेशातील पर्यटक व अनेक शैक्षणिक सहली आल्यानंतर ह्याच मार्गाने सरोवर पाहण्यासाठी उतरत होते. एकेकाळी हजारो पर्यटकांची तहान भागवणारा रामगया झरा आज मात्र स्वत: च पाण्याच्या प्रतीक्षेत व्याकुळलेला दिसून येत आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणारे हजारो पर्यटक रामगया मंदिर परिसरात थांबत होते. झºयातील पाणी गोड असल्याने ह्याच ठिकाणी पर्यटक मेजवानी करत आणि विसावा घेत. विद्यार्थी याच झºयातील पाण्यावर आपली तहान भागवत सहलीचा आनंद घेत. परंतु अनेकांची तहान भागवणारा रामगया झराच गेल्या दहा वर्षापासून तहानलेला आहे. रामगया झºयाच्या पाठोपाठ गेल्या पाच वर्षापासून पापहरेश्वर धार हि आटलेली होती. महाराष्ट्र भरातून अनेक भाविक अस्थी विसर्जन करण्यासाठी येथे येत होते. त्यानंतर ह्याच ठिकाणी अनेक धार्मिक विधी केल्या जात होते. ह्या धारेचेही पाणी गोड होते. अखंड वाहणारे पापहरेश्वर धार तीर्थ गेल्या पाच वर्षापासून आटलेले होते. यावर्षीच्या पावसामुळे पापहरेश्वर धारेला पाणी आले आहे. पापहरेश्वर धारतिर्थला पाणी आल्याने पाहण्यासाठी भाविक, पर्यटन प्रेमी नागरिकांची गर्दी वाढली आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :Lonarलोणारlonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणा