पाणीपुरवठय़ाचा वाद टोकाला!

By Admin | Updated: May 20, 2014 00:40 IST2014-05-20T00:16:04+5:302014-05-20T00:40:12+5:30

मलकापुरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटल्याने सुमारे पाऊण लाख जनता चांगलीच अडचणीत आली आहे.

Water dispute ends! | पाणीपुरवठय़ाचा वाद टोकाला!

पाणीपुरवठय़ाचा वाद टोकाला!

मलकापूर: मलकापुरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटल्याने सुमारे पाऊण लाख जनता चांगलीच अडचणीत आली आहे. मलकापूरसाठी १३ कोटीची नवीन योजना मंजूर झाली. मात्र तोवर गरज भागविण्यासाठी जिल्हा परिषद अखत्यारीत महाजल योजनेच्या नळगंगा धरणातील पाण्यासाठी वाकोडी या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाण्यासाठीचा हट्ट स्थानीय पालीका प्रशासनाने धरला आहे. मलकापूर शहरात २२ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला आहे. स्थानिय पालीका प्रशासनाच्या पाठपुराव्यातून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सुजल निर्माण या योजनेत १३ कोटी रूपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरात दिली आहे. मे महिन्यात त्या कामाची निविदा प्रकाशीत झाल्यानंतर डिसेंबर १४ अखेरीस या योजनेतील जलवाहिनी बदल व नवीन मोटारपंपाचे काम पुर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तात्पुरती उपाययोजना म्हणून मलकापूर पालिका प्रशासनाने वाकोडी महाजल योजनेतुन पाण्याची मागणी केली आहे. पण त्यास वाकोडी ग्रामपंचायतीने एका ठरावाव्दारे नकार दिला आहे.

Web Title: Water dispute ends!