शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा तहसील कार्यालय वार्‍यावर

By admin | Updated: July 29, 2014 20:48 IST

लाच घेतल्याप्रकरणी तहसीलदार खान यांच्या निलंबनानंतर तहसील कार्यालयाची अवस्था बेभरवशाची झाली

नांदुरा : लाच घेतल्याप्रकरणी तहसीलदार खान यांच्या निलंबनानंतर तहसील कार्यालयाची अवस्था बेभरवशाची झाली असून प्रभारी तहसीलदार शेलार यांच्या कारकिर्दीत महत्वाच्या विभागातील कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याने ग्रामीण भागातील जनतेची मोठय़ा प्रमाणावर हेळसांड होत आहे. येथील तहसीलदार खान यांना लाच स्वीकारताना पकडण्यात आल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे सद्या येथील तहसीलदारांचा प्रभार नायब तहसीलदार शेलार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने येथील तहसील कार्यालयातील महत्वाच्या विभागातील कर्मचार्‍यांची अनेकवेळा कार्यालयास दांडी असते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांचे काम होण्यासाठी चकरा माराव्या लागतात. या त्रासाला कंटाळून अखेर काहीजण नाईलाजाने दलालांच्या हातात पैसा सोपवून आपली कामे करुन मोकळे होतांना दिसतात. एकंदरीत राज्य शासनाचा महत्वाचा विभाग असलेल्या महसूल विभागाकडून सर्वसामान्याची आर्थिक पिळवणूक होत असल्याने या विभागाबाबत सर्वत रोष व्यक्त होत आहे. काल २५ जुलै रोजी प्रभारी तहसीलदार शेलार हे अमरावती येथे गेले होते तर पुरवठा विभागातील सर्व कर्मचारी गैरहजर असल्याने या विभागात शुकशुकाट दिसला. या विभागात नवीन रेशनकार्ड, दुय्यम रेशनकार्ड, अन्न सुरक्षा योजना तसेच इतर दाखल्यांसाठी मोठय़ा प्रमाणावर शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी गर्दी केली होती. पुरवठा विभागामध्ये नेहमीच नागरिकांना नियमित कामासाठी त्रस्त केल्या जाते. जेणेकरुन दलालांना आयतीच संधी मिळते. परंतु जिल्हा प्रशासनाचा यावर कोणताच वचक नसल्याने सर्व सामान्यांची विविध कामासाठी आर्थिक पिळवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेष म्हणजे तहसील कार्यालयातील बहुसंख्य कर्मचारी बाहेरगावावरुन जाणे-येणे करतात. त्यामुळे कार्यालय उघडल्यानंतरही तास, दोन तास या कार्यालयात कुणीच नसते. कार्यालयात असलेली थंब इम्प्रेशनची मशीन नावापुरतीच आहे. लेटलतीफ कर्मचार्‍यांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने कर्मचार्‍यांची मुजोरी वाढली आहे.