शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

मजुरी न मिळाल्याने आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:38 IST

हनवतखेड येथील मजुरांनी काटेपांग्री, तढेगाव, नागझरी, दरेगाव, साखरखेर्डा, शेंदुर्जन या रोडलगत निंदन करणे, वृक्षांना पाणी टाकणे, मरगळ आलेली झाडे ...

हनवतखेड येथील मजुरांनी काटेपांग्री, तढेगाव, नागझरी, दरेगाव, साखरखेर्डा, शेंदुर्जन या रोडलगत निंदन करणे, वृक्षांना पाणी टाकणे, मरगळ आलेली झाडे पुन्हा लावणे, दगडी पोळ तयार करणे आदी कामे २०२०-२१ मध्ये केली होती. तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अभिमन्यू खलसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धनपाल लद्धड व दीपक फुके यांच्या उपस्थितीत ही कामे झाली आहेत. ही कामे केल्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दर महिन्याला मजुरांची मजुरी द्यायला पाहिजे होती; परंतु एक वर्ष लोटूनही भगवान महाजन, राजू तितनवरे (हनवतखेड), राजू सावरकर शेंदुर्जन यासह इतर मजुरांचे १८ लाख ५० हजार रुपये सार्वजनिक वनविभागाकडे बाकी आहेत. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना या अगोदर सांगण्यात आली होती. त्यांनी मजुरांचे थकीत पैसे देण्याचे आदेश खलसे यांना दिले होते. त्यांनी अद्याप मजुरीचे पैसे दिले नाहीत. खलसे यांची मराठवाड्यात बदली झाल्यामुळे आपली मजुरी हडप करण्याचा डाव असल्याचा आरोप वनमजुरांमधून होत आहे. त्यामुळे ९ सप्टेंबरपर्यंत मजुरीचे पैसे मिळाले नाहीत, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा भगवान महाजन, राजू तितनवरे, राजू सावरकर यांनी दिला आहे.

--३५ मजूरांचा प्रश्न--

या अगोदर वनमजूर मधुकर खंडारे यांनीसुद्धा महिला मजुरांचे पैसे मिळावे, यासाठी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यांना २० हजार रुपये देऊन उर्वरित पैसे नंतर देण्याच्या लेखी आश्वासनावर उपोषण मागे घेतले. या कामावर ३५ मजूर होते. त्यांच्या मजुरीचे पैसे अद्याप मिळाले नाही.

(भगवान माधव महाजन, वनमजूर, हनवतखेड. )

----

यशोदा मजूर सहकारी संस्थेमार्फत वनमजुरांनी कामे केली होती. संस्थेचे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी या मजुरांना पैसे दिले आहेत.

(अभिमन्यू खलसे, सार्वजनिक वनअधिकारी, सिंदखेडराजा.)