शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी वार्ड पद्धतच योग्य

By admin | Updated: December 25, 2014 23:50 IST

प्रभाग नकोच : लोकमत परिचर्चेतून नगरसेवकांचा सूर.

बुलडाणा : राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या प्रभाग पद्धती बंद करून पुन्हा एकदा वार्ड पद्धत सुरू करण्याची तयारी भाजप सरकारने सुरू केली आहे. वार्ड पद्धतीमुळे पालिकांच्या निवडणुकीत होणारा अव्वाच्या सव्वा खर्च थोपविता येणार असून, ही पद्धत राजकीय पक्षाच्या सोयीची असली तरी नागरिकांच्या तसेच नगरसेवकांच्या दृष्टीने गैरसोयीची असल्यामुळे वार्ड पद्धतच योग्य आहे, असा सूर लोकमतने आज घेतलेल्या परिचर्चेतून निघाला. दरम्यान, वार्डनिहाय निवडणुका घेतल्यास नगराध्यक्ष जनतेतून निवडावा, अशा सूचनाही काही नगरसेवकांनी मांडल्या. सन २00१ पर्यंंत राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका वार्ड पद्धतीने घेण्यात येत होत्या; २00१ मध्ये शासनाने प्रभाग पद्धती सुरू केली. त्यावेळी तीन वार्डांंचा मिळून एक प्रभाग तयार करण्यात आला, त्यामुळे स्वाभाविकच एका प्रभागाचे प्रतिनिधीत्व तीन नगरसेवक करीत होते. सन २00६ मध्ये पुन्हा शासनाने प्रभाग पद्धती बंद करून वार्ड पद्धतीनुसारच पालिकेच्या निवडणुका घेतल्या; परंतु सन २0११ च्या नगरपालिका निवडणुकीत तत्कालीन कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारने पुन्हा एकदा प्रभाग पद्धत सुरू केली. यावेळी एका प्रभागातील मतदारांना चार नगरसेवक निवडण्याचा अधिकार बहाल करण्यात आला होता; आता पुन्हा राज्यात नव्याने सत्तारूढ झालेल्या भाजप, शिवसेनेच्या सरकारने प्रभाग पद्धतीला मूठमाती देऊन वार्ड पद्धत सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे नगरपालिकांच्या आगामी निवडणुका वार्ड पद्धतीनेच होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात ११ नगरपालिका आहेत, तर मोताळा आणि संग्रामपूर या दोन नगर पंचायती प्रस्तावित आहेत. नगरसेवक संजय गायकवाड , राजू काटीकर, दत्ता काकस, हेमंत खेडेकर, मो. सज्जाद व भाजप शहर अध्यक्ष अँड.अमोल बल्लाळ या परिचर्चेत सहभागी झाले होते.