शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

बुलडाण्यात दोन गटांमध्ये दगडफेक; पाच जखमी, एकाची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 11:10 PM

जमावाकडून दोन वाहनांची तोडफोड 

खामगाव : बुलडाण्यातील खामगावमधील हनुमान मंदिराजवळ कचरा टाकण्यावरून वाद उद्भवल्याने दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. यात पाचजण जखमी असून एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. पोलिसांनी परिस्थिती लगेचच नियंत्रणात आणली. मात्र या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.खामगाव शहरापासून जवळच असलेल्या सजनपुरी भागातील रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिराशेजारी कचरा टाकण्यावरून शनिवारी संध्याकाळी दोन गटात वाद उद्भवला. या वादाचे पर्यवसन दगडफेकीत झाले. यात पाच जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींपैकी तिघांवर सामान्य रुग्णालयात तर एकावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. खासगी रूग्णालयात भरती असलेल्या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने, त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजते. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला असतानाच, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वेळीच परिस्थिती नियत्रंणात आणली. 

तिघांवर सामान्य रूग्णालयात उपचारदोन्ही गटाकडून करण्यात आलेल्या तुफान दगडफेकीत जखमी झालेल्या तिघांवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमोल भास्कर गीते (२२), शे. अजीज शे. लुकमान (२२), किशोर मारोती नाईक (२५) अशी जखमींची नावं आहेत. तर डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी असलेल्या अनिल दशरथ बेनीवाल (३२) यांच्यावर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर नटवरलाल गोपीलाल पल्लोड (६०) रा. पैठण जखमी अवस्थेत घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती आहे. 

रिक्षा उलटवली; चारचाकीच्या फोडल्या काचाया घटनेत एक रिक्षा उलटविण्यात आली. तर एका चारचाकी गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. काचा फुटल्याने पैठण येथील एक व्यक्ती जखमी झाल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. एका विशिष्ट समाजाच्या वस्तीवर दुसऱ्या गटाकडून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या वस्तीतील नागरिकांचे प्रंचड नुकसान झाले.

पोलिसांच्या मदतीला धावला वरूणराजादोन गटात दंगल उद्भवल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी खामगावात पाऊस सुरू झाला. दगडफेकीत नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पावसाची चांगलीच मदत झाली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. सोबतच शिवाजी नगर पोलिस स्टेशनचा ताफाही धडकला. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव