बोरखेड, तारापूरमध्ये अज्ञात तापाची साथ

By Admin | Updated: October 2, 2015 02:17 IST2015-10-02T02:17:56+5:302015-10-02T02:17:56+5:30

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष; नागरिक भयभित.

An unidentified copper coaster in Borkhed, Tarapur | बोरखेड, तारापूरमध्ये अज्ञात तापाची साथ

बोरखेड, तारापूरमध्ये अज्ञात तापाची साथ

बुलडाणा : तालुक्यातील बोरखेड, तारापूर, पलढग या तीन गावात मागील चार दिवसांपासून अज्ञात तापाची साथ पसरली असून, अनेक रुग्ण तापाने फणफणत आहेत. बोरखेड येथे १५ ते २0 विद्यार्थ्यांना तापाची लागण झाली आहे. परतीचा दोन दिवस पाऊस झाल्यानंतर सध्या तापमानामध्ये कमालीची वाढ झाली आहे. या बदलत्या वातावरणामुळे विविध रोगाची लागण होत आहे. विशेषत: ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर तापाची साथ पसरली आहे. बोरखेड येथे दररोज चार ते पाच विद्यार्थी तापाने फणफणत शाळेतून घरी जातात. त्यांना अचानक बुलडाणा येथे रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचे एका शिक्षकाने सांगितले. सध्या ग्रामीण भागात सोयाबीन सोंगणीचे कामे सुरू असल्यामुळे मजुरी करणार्‍या नागरिकांना काम सोडून रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. यासंदर्भात वरवंड आरोग्य केंद्राला कोणतीही माहिती नसून आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वरवंड आरोग्य केंद्रामध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध नसून डॉक्टरसुद्धा वेळेवर उपस्थित राहात नसल्याचा आरोप होत आहे.

Web Title: An unidentified copper coaster in Borkhed, Tarapur