दोन ट्रक भिडले, तीन जण जीवाने गेले, एक गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 14:24 IST2024-03-09T14:23:56+5:302024-03-09T14:24:13+5:30

अपघातानंतर दोन तास वाहतूक खोळंबली होती.

Two trucks collide, three dead, one seriously | दोन ट्रक भिडले, तीन जण जीवाने गेले, एक गंभीर 

दोन ट्रक भिडले, तीन जण जीवाने गेले, एक गंभीर 

मलकापूर (जि. बुलढाणा) : भरघाव दोन ट्रकच्या भीषण अपघातात तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ५३ वर तालसवाडा फाट्यानजीक शुक्रवारी, सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर दोन तास वाहतूक खोळंबली होती.

 पाचोरा येथील एक ट्रक   भुसावळ येथून अकोल्याकडे येत होता. तालसवाडा फाट्यानजीक विरुद्ध दिशेने दुसरा ट्रक येत होता. दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. यात अकोल्याकडे जाणाऱ्या ट्रकचा  वाहक सचिन ज्ञानेश्वर पिलोरे (वय ३२, रा. पतखडी, बेलदार वाडी, जळगाव) व चालक रघुवीर सिंह (३९, मध्य प्रदेश) हे दोघे जागीच ठार झाले. जखमी दोघांपैकी समाधान पवार (३८, रा. लव्हारा पाचोरा) यांचा उपचाराला नेताना मृत्यू झाला. रामलाल मीना (वय ४८, मध्य प्रदेश) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 

Web Title: Two trucks collide, three dead, one seriously