शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

विविध अपघातात दोन ठार

By admin | Updated: May 24, 2017 01:04 IST

एक गंभीर : लोणार, सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

बुलडाणा : सिंदखेडराजा व लोणार तालुक्यात झालेल्या दोन विविध अपघातात दोन ठार तर एक गंभीर जखमी झाला. साखरखेर्डा : साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत अमडापूर-लव्हाळा रोडवर लोणी लव्हाळाजवळ ट्रॅक्टर व मोटारसायकलचा अपघात होऊन दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना २२ मे रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. मंगरुळ नवघरे येथील गणेश आनंदा काकडे हा लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी लव्हाळा भागात आला. त्याच्यासोबत श्याम सुधाकर सिरसाट या युवकाला घेतले होते. परिसरात लग्न पत्रिका वाटप करुन दोघेही रात्री ९.३० वाजता मोटारसायकल क्र.एम.एच.२८ ए.पी.७३१६ ने परत जात होते. लोणी शिवारात उंद्री येथून पाच ट्रॅक्टर मळणीयंत्र घेऊन वर्दडी वैराळ येथे येत असताना ट्रॅक्टर क्र.एम.एच.२८ ए.जे.५३१४ या ट्रॅक्टरचालकाने भरधाव ट्रॅक्टर चालवून मोटार सायकलला धडक दिली. ट्रॅक्टर मागील पेरणी यंत्राला जबर धडक लागल्याने पेरणी यंत्राचे फाळ पोटात शिरले आणि दोघेही घटनास्थळीच ठार झाले. उपरोक्त अपघाताची माहिती ठाणेदार ब्राम्हणे यांना मिळताच त्यांनी बिट जमादार संजय कोल्हे, राजेश मापारी, अरुण चव्हाण, सुयोग महापुरे हे घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत ट्रॅक्टरचालक फरार झाला होता. त्याचा पाठलाग करून ट्रॅक्टरसह पोलीस स्टेशनला हजर केले. उमेश सुरेश काकडे यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांनी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. लोणार : रेतीचे टिप्पर चुकविताना मालवाहन क्रमांक एम.एच.०५. ए.एम.३८४४ चा मंगळवारी अपघात होऊन रस्त्याच्या कड्यावरील निंबाच्या झाडावर आदळले. यामध्ये चालक नीलेश कळासरे हा गंभीर जखमी झाला असून, लोणार ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे पाठविण्यात आले आहे. सदर घटना लोणार ते रिसोड मार्गावरच मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली. यामुळे संतप्त नागरिकांनी काही वेळासाठी रास्ता रोको केला.