जळगाव जामोद तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू, महिला गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 00:46 IST2022-08-21T00:44:08+5:302022-08-21T00:46:06+5:30
निमकराळ भागातील आडोळ, मांडवा, तिवडी, गीलखेड, दादुलगाव या परिसरात शनिवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

जळगाव जामोद तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू, महिला गंभीर
बुलढाणा - जळगाव जामोद तालुक्यातील निमकराळ येथे वीज पडून दोघांचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना २० ऑगस्स्ट रोजी घडली. निमकराळ भागातील आडोळ, मांडवा, तिवडी, गीलखेड, दादुलगाव या परिसरात शनिवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
सध्या शेतातील कामे सुरू असल्याने निमकराळ येथील अमोल रघुनाथ पिसे (वय २२ वर्ष ) मधुकर तुळशीराम उगले (वय ५६ वर्ष) आणि त्यांच्या पत्नी यमुना मधूकर उगले (वय ४८ वर्षे) तीघेही शेतात काम करत होते. विजांच्या कउकडाटासह पावसाला सुरवात झाली. त्यामुळे तिघेही शेतातील झाडाखाली उभे होते. त्या झाडावर विज पडली. झाडाखाली असलेल्या अमोल पिसे आणि मधूकर उगले या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर यमुना उगले या गंभीर जखमी झाल्या आहेत.