शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

होलारपुऱ्यात दोन गटांत हाणामारी; १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

By admin | Updated: July 5, 2017 00:15 IST

शेगाव : शेगाव शहरातील होलारपुरा परिसरात सोमवारी रात्री दोन गटांत हाणामारी झाली असून, पोलिसांनी परस्पर तक्रारींवरून दोन्ही गटाच्या १६ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शेगाव शहरातील होलारपुरा परिसरात सोमवारी रात्री दोन गटांत हाणामारी झाली असून, पोलिसांनी परस्पर तक्रारींवरून दोन्ही गटाच्या १६ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.सचिन श्याम मोरे (वय २७) रा. होलारपुरा, सरकारी फैल, शेगाव याने दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी हा आरोपी गणेश ढाळेसोबत बोलत असताना फिर्यादीचा भाऊ जितू मोरे हा तेथे आला व म्हणाला, की तू समाजाचा नेता नाही, असे म्हटले असता आरोपीच्या सोबत असलेल्या इतर आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून जितू मोरे याला मारहाण करून खाली पाडले व डोक्यात लोखंडी पाइप मारून जखमी केले, तसेच फिर्यादीचा लहान भाऊ गणेश मोरे यालासुद्धा पाठीवर लोखंडी पाइप मारला व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या रिपोर्टवरून व मेडिकल सर्टिफिकेटवरून पोलिसांनी आरोपी गणेश ढाळे, विशाल करडे, विलास केंगारकर, अजय करडे, करण करडे, विजय नामदास, राकेश नामदास रा. होलारवाडा सरकारी फैल शेगाव यांच्याविरुद्ध अप.क्रं. २९४/१७ कलम १४३, १४८, १४७, १४९, ३२४, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास पो.हे.काँ. बळीराम वरखेडे व पो.काँ. प्रकाश शेळके हे करीत आहेत. राकेश राजू नामदास (वय २२) वर्षे रा. होलारपुरा, सरकारी फैल शेगाव याने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी संदीप मोरे हा म्हणाला, की तू आमचे नाव पोलिसांत का सांगितले, असे म्हणून त्याची गच्ची पकडून व आरोपी युवराज मोरे, सोनू मोरे, आकाश मोरे याने त्याच्या हातातील काचेची बॉटल फिर्यादीच्या कानावर मारली व चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. इतर आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपी आरोपी युवराज मोरे, सोनू मोरे, आकाश मोरे, जितू मोरे, सचिन मोरे, राकेश आयवडे, गणेश मोरे, अजय सोनुने, संदीप मोरे रा. होलारवाडा सरकारी फैल शेगाव यांच्याविरुद्ध अप.क्रं.२९५/१७ कलम १४३, १४७, ३२४, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास पो.हे.काँ. बळीराम वरखेडे व पो.काँ. प्रकाश शेळके हे करीत आहेत.