शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी दोन कोटीचा प्रस्ताव

By admin | Updated: September 15, 2014 01:07 IST

बुलडाणा जिल्हाधिका-यांनी घेतली एकफळ गावाची दखल

फहीम देशमुख/शेगाव पावसाळ्यात तालुक्याशी रस्त्याअभावी संपर्क तुटणार्‍या एकफळ या गावाची व्यथा लोकमतने प्रकाशित करताच जिल्हाधिकार्‍यांनी याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस् त्यासाठी दोन कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार करून मागविले आहे. शेगाव तालुक्यातील एकफळ या गावाला तालुक्याला जोडणारा रस्ता उपलब्ध नसून, पाऊस आला की या गावाचा संपर्क तुटतो. ही बाब लक्षात घेता लोकमत चमूने या गावात जाऊन तेथील नागरिकांची व्यथा मांडली. याची दखल घेत दुसर्‍याच दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी या गावास भेटी देऊन रस्त्यातील अडथळे कसे दूर होतील याबाबत टिपण्या घेतल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी शेगावात बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी लोकमतच्या वृत्तावर अधिकार्‍यांशी चर्चा केली व ही बाब खरी आहे काय, याची शहानिशा केली. यावर सा.बां. विभागाच्या अधिकार्‍यांनी एकफळ या गावाला खरोखरच रस्ता नाही व रस्ता उपलब्ध करावयाचा असल्यास त्याला दोन पूल आणि भूसं पादनाची प्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकारी किरण कुरंदकर यांनी रस्त्यासाठी अपेक्षित असलेला निधी व याबाबतचा आराखडा तत्काळ आपल्याकडे सादर करावा त्याला मंजुरात देण्यासाठी सवरेतोपरी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. एकफळ व कुरखेड या गावांना जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने तेथील नागरिकांनी येत्या निवडणुकीवर बहिष्कार जाहीर केलेला आहे. शिवाय नेत्यांना प्रचारासही बंदी घातली आहे. शेगाव तालुक्यातील या दोन गावांपैकी एकफळ हे खामगाव तर कुरखेड गाव हे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात येते. येथील लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे.; मात्र आता जिल्हाधिकार्‍यांनी या गावाची दखल घेतल्याने या गावांना तालु क्याशी जोडणारा व हक्काचा रस्ता पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.