शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

कापूस भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 12:13 PM

Cotton Purchase News वाढलेल्या दराचा फायदा खरेदी करणा-या व्यापाऱ्यांनाच होणार आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सीसीआयने कापसाची खरेदी सुरू केली. मात्र, बोंडसड व बोंडअळीने कापसाची प्रत घसरल्यामुळे कापसाला भाव कमी मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापसाची विक्री केली. व्यापाऱ्यांनी सुरुवातीला कापूस निघाल्यावर कमी भावात खरेदी केला.    व्यापाऱ्यांनी गावातून ५३०० रुपयांपासून कापसाची खरेदी केली आहे. आता कापसाला ५६०० ते ५७०० रुपये भाव मिळत आहे. आता क्विंटलमागे ४०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे वाढलेल्या दराचा फायदा खरेदी करणा-या व्यापाऱ्यांनाच होणार आहे.     प्रारंभी खुल्या बाजारात कापसाचे दर ५४०० ते ५५०० रुपये क्विंटल होते. आता कापसाचा दर ५७०० रुपये क्विंटल झाला  आहे.  काही ठिकाणी चांगल्या कापसाला ५९०० रूपये दरही मिळत आहे. त्यामुळे शासकीय केंद्रांकडे  शेतकर्यांनी पाठ फिरविली आहे.  . दरवर्षी १५ जानेवारीनंतर कापसाच्या दरात घसरण होते. यावर्षी मात्र उलटे चित्र आहे. १५ जानेवारीनंतर कापूस घसरेल आणि वाढत्या उन्हाचाही वजनावर परिणाम होईल, यामुळे शेतक-यांनी १५ जानेवारीपूर्वीच मोठ्या प्रमाणात कापसाची विक्री केली. त्यातच, गुलाबी बोंडअळी आल्याने कापसाचे नुकसान झाले.  खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव, घाटपुरी, पळशी बु. या भागातील शेतकऱ्यांच्या कापसाच्या उत्पादनात ५० टक्के घट आली आहे. जिल्ह्यातही बहुतांश भागातील शेतकऱ्यांना बोंडअळीमुळे ५० टक्केच उत्पादन झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या घरात आता मोजकाच कापूस शिल्लक राहिला आहे. कृषी अधिकाऱ्यांनी फरदडीचा कापूस घेऊ नये, असे आवाहन केले आहे. फरदडीचा कापूस घेतला तर बोंडअळीचा प्रादुर्भाव पुढील वर्षीही कायम राहील तसेच आणखी वाढ होईल, असा इशारा कृषी विभागाने दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी फरदडीचा कापूस घेतला नाही. त्यामुळेही कापसाच्या आवकमध्ये घट झाली आहे. 

चांगल्या प्रतीच्या कापसाला ५९०० रूपये भाव मलकापूर येथे चांगल्या प्रतीच्या कापसाला गत दोन दिवसात ५७०० ते ५९०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.  बार्शिटाकळी येथे ५६०० ते ५६५० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.  खामगाव येथे कापसाला प्रतिक्विंटल ५५०० ते ५७०० रूपये दर मिळत आहे. 

कापसाच्या दरात वाढ होत आहे. मलकापूर, खामगाव व बार्शिटाकळीच्या बाजारात कापसाला गत काही दिवसांमध्ये चांगला दर मिळाला. यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे दर वाढले आहे.- शेख, युनूस, व्यापारी, खामगाव 

टॅग्स :khamgaonखामगावMalkapurमलकापूरcottonकापूसFarmerशेतकरी