शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींच्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघे जखमी

By admin | Updated: July 30, 2015 23:15 IST

खामगाव येथील घटना.

खामगाव (जि. बुलडाणा ): दुचाकींच्या वेगवेगळ्या तीन अपघातांमध्ये तिघे जखमी झाले. या घटना २९ व ३0 जुलै रोजी घडल्या. चांगेफळ येथे दुचाकीने जात असलेले निवाणा येथील कपिल संजय भिलंगे व प्रमोद समाधान धामोडे यांच्या वाहनाची मार्गाने जात असलेल्या विजय देवराज टेकाडे (१७, रा. निवाणा) याच्या सायकलला मागून धडक लागली. यामध्ये विजय टेकाडे हा गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने १0८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात हलविण्यात आले. दुसरी घटना शेगाव-नागझरी मार्गावर घडली. शेगाव तालुक्यातील कळंबा येथील रहिवासी सुमीत किसन आरज (२५) हा मित्रासोबत २९ जुलै रोजी रात्री मोटारसायकल (एमएच३0-एजे-९२६५) ने घराकडे जात असताना समोरून येणार्‍या मोटारसायकल (एमएच २८ एम-१३९३) च्या चालकाने समोरून भरधाव येऊन जबर धडक दिली. अपघातात सुमीत किसन आरज हा जखमी झाला तसेच मोटारसायकलचेही नुकसान झाले. दरम्यान दुचाकी घसरल्याने चालक जखमी झाल्याची घटना शेगाव मार्गावर खामगावनजीक जयपूर फाटा वळणावर ३0 जुलै रोजी सायंकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास घडली. मोहना मांडवा (ता. मेहकर) येथील गणेश हरिभाऊ मोहिते (२७) हा दुचाकीने खामगावकडून शेगाव येथे जात होता. जयपूर फाटा वळणावर त्याचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर येथील सामान्य रुग्णालयात प्रथमोचार केल्यानंतर अकोला येथे हलविण्यात आले.