संभाजीनगर शिकवा म्हणत शिक्षिकेला जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 12:18 IST2022-07-25T12:17:28+5:302022-07-25T12:18:04+5:30

पूजा कैलास वाकोडे (२६) या शिक्षिकेने नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली

Threatened to kill the teacher saying teach Sambhajinagar in buldhana | संभाजीनगर शिकवा म्हणत शिक्षिकेला जीवे मारण्याची धमकी

संभाजीनगर शिकवा म्हणत शिक्षिकेला जीवे मारण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा (जि. बुलडाणा) : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या शिक्षिकेला काही युवकांनी भररस्त्यात अडवून विद्यार्थ्यांना औरंगाबादच्या ऐवजी संभाजीनगर का शिकवत नाही, असे म्हणत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २२ जुलै रोजी बुलडाणा रोडवरील हेलगेनगरजवळ घडली. 

पूजा कैलास वाकोडे (२६) या शिक्षिकेने नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये शाळा सुटल्यानंतर घरी परत जात असताना, आरोपी जितू मोरे, अक्षय डंबेलकर व इतर काही अनोळखी मुले यांनी भररस्त्यात अडविले. नांदुऱ्यात कसे राहता, बघून घेतो, असे म्हणत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे.

Web Title: Threatened to kill the teacher saying teach Sambhajinagar in buldhana