शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरशेवलीत हजारो भक्तांनी घेतले सोमनाथाचे दर्शन

By admin | Updated: April 11, 2017 00:02 IST

चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथे शेकडो वर्षांपासूनची सोमनाथ महाराजांच्या यात्रेची परंपरा कायम आहे.

बुलडाणा : चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथे शेकडो वर्षांपासूनची सोमनाथ महाराजांच्या यात्रेची परंपरा कायम आहे. मंदिरावर जाऊन हजारो भाविकांनी सोमनाथाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. डोंगरशेवली येथे दरवर्षी गुढीपाडव्यानंतर बारा दिवसांनी आमली बारसेला सोमनाथ महाराज मंदिरावर संस्थान व गावकर्‍यांच्यावतीने यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मंदिराजवळील समाधान सावळे यांच्या शेतात यात्रा भरविण्यात आली होती. शेकडो वर्षांची परंपरा असल्याने भाविक मोठय़ा संख्येने हजेरी लावतात. संस्थान व गावकर्‍यांच्यावतीने २२ क्विंटल गव्हाचा महाप्रसाद बनविण्यात आला होता. सायंकाळी साडेचार वाजता महाप्रसाद वितरित करण्यात आला. चिखली येथील राजू महाराज दर सोमवारी मंदिरावर पूजा करत असल्याने त्यांचे भक्त दूरवरून मंदिरावर आले होते. रात्री ८ वाजेपयर्ंत महाप्रसादाचे शिस्तीत वाटप करण्यात आले. यावेळी अमडापूर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. यात्रेनिमित्त भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, जि.प. महिला व बाल कल्याण समिती सभापती श्‍वेता महाले यांच्यासह अनेक मान्यवरांनीदेखील मंदिरावर भेट देऊन दर्शन घेतले. यात्रा संपल्यानंतर दुसर्‍या दिवशी डोंगर शेवली येथे देवीचे सोंग काढण्यात आले. सावळे परिवारामध्येच हे सोंग देण्याचा मान आहे. यावर्षी बबलू अशोक सावळे यांनी देवीचे सोंग घेतले. सकाळी साडेसात वाजता देवीची पूजा करून गावभर सोंगाची मिरवणूक निघाली. या उत्सवात हिंदू-मुस्लीम समाजाचे लोक सहभागी झाले होते.