शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'...तर पोलिस ठाण्यासमोर थाटणार वरली-मटक्याचे दुकान'; अवैध धंद्याविरोधात महाविकास आघाडीचा अल्टीमेटम

By निलेश जोशी | Updated: September 28, 2023 19:45 IST

आठ दिवसात हे सर्व प्रकार थांबले नाही तर थेट बुलढाणा पोलिस ठाण्यासमोरच मंडप टाकून वरली मटक्याचे दुकान थाटून जिल्ह्यात सुरू असलेले सर्व अवैध धंदे तेथे बसून करू, असा इशारा अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धिरज लिंगाडे यांनी दिला आहे.

बुलढाणा : सुशिक्षीत व सुसंस्कृत अशी ओळख असलेल्या बुलढाणा शहरात अवैधधंदे वाढले असून शहरात खुलेआम गांज्याची विक्री होत असून गल्ली बोळात वरली-मटक्याची दुकाने थाटली गेली आहे. आठ दिवसात हे सर्व प्रकार थांबले नाही तर थेट बुलढाणा पोलिस ठाण्यासमोरच मंडप टाकून वरली मटक्याचे दुकान थाटून जिल्ह्यात सुरू असलेले सर्व अवैध धंदे तेथे बसून करू, असा इशारा अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धिरज लिंगाडे यांनी दिला आहे.

२८ सप्टेंबर रोजी त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा इशारा दिला. गेल्या एक वर्षात शहरात गुंडागर्दी वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रसेचे जिल्हाध्यक्ष राहूल बोंद्रे, प्रदेश सचिव जयश्री शेळके यांच्यासाबेत महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश शेळके, सुनील सपकाळ व अन्य उपस्थित होते.

सुसंस्कृत बुलढाणा शहरात आज जागोजागी गांजाची विक्री होत असून तरुणाई व्यसनाधिनतेच्या गर्तेत अडकत आहे. पोलिसांच्या डोळ्या देखत हा संपूर्ण प्रकार होत असून त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत डॉक्टर लाईन, जुनी विहीर, बाजार समिती परिसर, कारागृहाच्या मागे, क्रीडा संकुल लगत, चिखली रोडवर सर्रास पणे गांजा पिणाऱ्यांच्या टोळ्या बसलेल्या आहेत. त्यांना नेमके कोण गांजा पुरवते बुलढाण्यात गांजा येथे कुठून असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

वरली मटक्याबाबतही ही स्थिती बुलढाण्यात असून गल्ली बोळात सुरू असलेली मटक्याच्या दुकानांची नावेच त्यांनी सांगत यासंदर्भातील पुरावेही असल्याचे अधोरेखीत केले. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असून वरिष्ठांच्या मर्जीसह या बाबी होत नसल्याचेही ते म्हणाले. अशा धंद्याच्या माध्यमातून काही ठरावीक मंडळी पैसा कमावत असल्याचेही आ. लिंगाडे म्हणाले. यासंदर्भात पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांना निवेदन दिले असले तरी आम्ही थेट पोलिस ठाण्यासमोरच वरली मटक्याचे मंडपात दुकान थाटून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. वरच्यांच्या मर्जीशिवाय हे शक्य नसल्याचे ते म्हणाले.

दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात हीच स्थिती असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहूल बोंद्रेही म्हणाले. ऑनलाईन गेम्स संदर्भातही त्यांनी माहिती देत याच्या नादी लागून युवा वर्ग आत्महत्येचा मार्ग पत्करत असल्याचे सांगितले. तीन प्रकरणामध्ये शेतकरी कुटूंबातील व्यक्तींना ३० ते ४० लाख रुपये मुलाचा जीव वाचविण्यासाठी भरल्याचे सांगितले. 

टॅग्स :PoliceपोलिसMLAआमदारbuldhanaबुलडाणा