शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

संचेतींच्या कार्यालयासमोर धरणे

By admin | Updated: June 8, 2017 02:34 IST

मलकापूर : शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी भाराकाँ, राकाँ, शेतकरी संघटना, किसान सभा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आमदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

मलकापूर : शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी भाराकाँ, राकाँ, शेतकरी संघटना, किसान सभा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आमदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या आ.संचेतींनी सरकार शेतकऱ्यांच्या सोबत असून, लवकरच शासन शेतकरी हिताचा निर्णय जाहीर करेल, असे मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई तायडे उपस्थित होत्या. शेतकरी आंदोलनाच्या सहाव्या दिवशी भाराकाँचे शहर अध्यक्ष राजू पाटील, शेतकरी संघटनेचे दामोधर शर्मा, किसान सभेचे दादा रायपुरे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमोल राऊत व विवेक पाटील यांच्या नेतृत्वात पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी आ.संचेती यांच्या कार्यालयावर धडकले. संचेती यांच्या कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त असल्याने शेतकरी व विविध पक्षांच्या नेत्यांनी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई शिवचंद्र तायडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनात भाराकाँचे शहर अध्यक्ष राजू पाटील, नगरसेवक अनिल गांधी, बंडू चौधरी, सुनील बगाडे, गजानन ठोसर, प्रल्हाद ढोले, प्रवीण पाटील, राजेश चव्हाण, एकनाथ डवले, बबन तायडे, विजय डागा, ज्ञानदेव सातव, अशोक डांगे, सुरेश भोजने, बाबूराव महाले यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. ३९ आंदोलनकर्त्यांना शहर पोलिसांनी स्थानबद्ध केले.