शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ने पकडली विनाटोकन मोजमाप होणारी तूर!

By admin | Updated: May 8, 2017 02:30 IST

या प्रकरणाची चौकशी केली व कारवाईचे आश्‍वासन.

चिखली : येथील नाफेड केंद्रावर विनाटोकन मोजमाप सुरू असलेले २00 पोती तूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ४ मे रोजी पकडून याबाबत कृषी पणन राज्यमंत्नी यांचे विशेष कार्याधिकारी घुले यांच्याकडे तक्रार केल्याने, या तक्रारीची गंभीरतेने दखल घेऊन, ६ मे रोजी जिल्हा पणन व्यवस्थापक ए.पी. पाटील यांनी चिखली नाफेड केंद्र गाठून, या प्रकरणाची चौकशी केली व कारवाईचे आश्‍वासन दिले. याबाबत माहिती शेतकर्‍यांनी स्वाभिमानीच्या पदाधिकार्‍यांना दिल्याने त्यांनी तत्काळ नाफेड केंद्र गाठले. या ठिकाणी ५८ कट्टे मोजमाप झाले होते, त्यामुळे उर्वरित कट्टय़ाचे मोजमाप स्वाभिमानीने टोकन नसल्याकारणाने रोकून धरल्याने या सर्व बाबीचा पंचनामा करण्यात आला होता. तसेच याबाबत कृषी व पणन राज्यमंत्नी यांचे विशेष कार्य अधिकारी घुले यांना चिखली नाफेड केंद्रावर होत असलेल्या काळ्याबाजाराबद्दल माहिती देऊन २00 पोती विनाटोकनाची तूर मोजण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. याबाबत घुले यांनी तत्काळ चौकशीचा आदेश दिल्याने जिल्हा पणन व्यवस्थापक ए.पी. पाटील यांनी चिखली नाफेड केंद्र गाठून प्रकरणाची सखोल चौकशी केली व याबाबत अहवाल सदर केला. सदर तुरीचा कुणीही मालक सापडून आला नाही, तर तूर जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असे सांगून व संबंधित दोषींवर मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी सहकारी संस्थेचे अधिकारी गारोळे, बाजार समितीचे चिंचोले, शिपणे, स्वाभीमानीचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक सरनाईक, नितीन राजपूत, दीपक सुरडकर, भरत जोगदडे, अनिल वाकोडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.