शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख शेतक-यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती

By admin | Updated: January 23, 2015 01:54 IST

दुष्काळप्रवण परिस्थितीत शासनाचा दिलासा; बुलडाणा जिल्ह्यात विविध बँकांनी केले ९0 कोटी ४६६ लाखांचे कर्ज वाटप.

बुलडाणा : कोठे अत्यल्प पाऊस, तर कोठे गारपीट यामुळे मागील वर्षीचा खरीप हंगाम शेतकर्‍यांच्या हातून गेला, त्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने यातून शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एका आदेशाद्वारे शेतकर्‍यांच्या पीककर्ज वसुलीला स्थगिती दिली. याचा बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ४५ हजार ६६0 शेतकर्‍यांना लाभ मिळणार असून, सुमारे ९0 कोटी ४६६ लाख रूपयाचे कर्ज शेतकर्‍यांना तूर्त भरण्याची गरज नाही. राज्यभरात काही भागात मागील वर्षी पडलेल्या अपुर्‍या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. तर काही भागात अतवृष्टी झाल्याने उभ्या पिकाची नासाडी झाली. विदर्भात उशिरा पाऊस आला तर पिके ऐन भरात असताना पावसाने उघाड दिल्याने पाण्याअभावी सोयाबीनचे पीक करपून गेले. त्यामुळे सोयाबीनची झडती एकरी दोन ते अडीच क्विंटलवर आली. कपाशी पिकालाही या अपुर्‍या पावसाचा फटका बसला. विदर्भातील कपाशी व सोयाबीन ही नगदी पिके गेल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ४५ हजार ६६0 शेतकर्‍यांनी विविध बँकांच्या माध्यमातून रब्बी व खरीप हंगामासाठी सुमारे ९0 कोटी ४६६ लाख रूपयांचे पीक कर्ज उचलले आहे. यामध्ये बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकांकडून ७ कोटी २ लाख ४८१ रुपयांचे पीककर्ज घेतलेले आहे. तर एक्सीस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसी बँक या खासगी बँकांकडून २ हजार १८५ शेतकर्‍यांनी ३ कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज उचलले आहे. एकट्या विदर्भ कोंकण (ग्रामीण) बँकेकडून २५ हजार ५३८ शेतकर्‍यांनी १४ कोटी ९३२ लाख रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. असे जिल्ह्यातील १ लाख ४५ हजार ६६0 शेतकर्‍यांनी ९0 कोटी ४६६ लाख रूपयाचे कर्ज घेतले आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही कर्ज भरण्यासाठी बँकांनी शेतकर्‍यांकडे तगादा लावला होता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. राज्य शासनाने तूर्त हे कर्ज भरण्यावर स्थगिती दिल्याने शेतकर्‍यांना काही दिवसासाठी का होईना दिलासा मिळाला आहे.  * दोन हेक्टरवरील शेतक-यांवर अन्याय!शासनाने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना जाहीर केलेली मदत काही शेतकर्‍यांवर अन्यायकारक ठरत असून, शासनाने ही मदत सरसकट दोन हेक्टरपर्यंत द्यावी, अशी मागणी धामणगाव बढे परिसरातील शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांसह दोन हेक्टरपर्यंतची मिळणारी मदत शासनाने जाहीर केलेली आहे. ज्या शेतकर्‍यांकडे दोन हेक्टरच्यावर जमीन आहे अशा शेतकर्‍यांना एक हेक्टरपर्यंतची शासकीय मदत मिळणार आहे. त्यामुळे दोन हेक्टरच्यावर जमीन असलेल्या शेतकर्‍यांवर एक प्रकारे अन्याय होत असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत.