गैरवर्तणूकप्रकरणी मुख्याध्यापक निलंबित

By Admin | Updated: December 20, 2014 00:13 IST2014-12-20T00:13:35+5:302014-12-20T00:13:35+5:30

सिंदखेडराजा तालुक्यातील मुख्याधापका विरोधात कारवाई.

Suspended headmistress on abusive behavior | गैरवर्तणूकप्रकरणी मुख्याध्यापक निलंबित

गैरवर्तणूकप्रकरणी मुख्याध्यापक निलंबित

सिंदखेडराजा (बुलडाणा) : तालुक्यातील सवडद येथील भास्करराव शिंगणे विद्यालयाचे मुख्याध्यापक बळीराम देशमुख यांना एका आदेशाद्वारे संस्थाध्यक्षांनी १९ डिसेंबर रोजी निलंबित केल्याची कार्यवाही केली आहे. सवडद येथील स्व. भास्करराव शिंगणे विद्यालयात बळीराम देशमुख हे मुख्याध्यापक पदावर कार्यरत झाले तेव्हापासून त्यांनी संस्थेची प्रगती करण्याऐवजी बदनामी केली आहे. कर्मचार्‍यांवर कोठेही नियंत्रण नाही. संस्थेच्या विकासात अडथळा निर्माण करून संस्थेमधील साहित्य लंपास करणार्‍या चोरट्यांना अभय देणे, संस्थेचे हित न जोपासणे, सरकारी कामात सहकार्य न करणे आदी प्रकारच्या अनेक नोटिसा त्यांना देऊनही सर्मपक उत्तर बळीराम देशमुख यांनी दिले नाही. उलट उद्धट भाषेत खुलासा देऊन संस् थाचालकांचा अपमान केला. १८ नोव्हेंबर रोजी संस्थाचालकांची बैठक होऊन मुख्याध्यापकांना निलंबि त करण्यात यावे, असा प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना पाठविण्यात आला. त्यावर माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी कोणतीही कारवाई वा चौकशी केली नाही. अखेर संस्थाचालकांचा १८ नोव्हेंबरचा निर्णय कायम ठेवत १९ डिसेंबर रोजी संस्थाध्यक्ष वसंतराव मगर यांनी बळीराम देशमुख यांना निलंबित केले. त्यांचा प्रभार साहाय्यक शिक्षक ए.व्ही. गव्हाळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Web Title: Suspended headmistress on abusive behavior