शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: November 29, 2014 00:03 IST

एसटी महामंडळाचा नियोजनशून्य कारभार विद्यार्थ्यांच्या अंगलट, विद्यार्थिनी ताटकळत.

संग्रामपूर (बुलडाणा) : साडेपाच वाजताची बस साडेसात वाजेपर्यंत आली नसल्याने धामणगाव गोतमारे, मारोड येथील विद्यार्थी-विद्यार्थींना अखेर रस्त्यावरच ठिय्या मांडल्याची घटना २८ नोव्हेंबरच्या रात्री ७ वाजता दरम्यान संग्रामपूर-जळगाव रोडवरील धामणगाव फाट्यावर घडली. यावेळी जळगाव जामोदकडे जाणार्‍या तीन बसेस रोखण्यात आल्या हो त्या व जळगाव जामोद आगाराच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. धामणगाव गोतमारे, मारोड येथून दररोज संग्रामपूर येथे ४0 ते ५0 विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात. त्यामध्ये इयत्ता पाचवी ते उच्च शिक्षण घेणार्‍यांची संख्या आहे. जि.प. हायस्कूल व संत गुलाबबाबा विद्यालयाचे हे विद्यार्थी आहेत. त्यासाठी सकाळी जळगाव जामोद वरुन जामोद मार्गे, मारोड, धामणगाव, संग्रामपूर अशी शालेय वेळेवर बस सोडण्यात येते व सायंकाळी साडेपाच (५.३0 वा.) वरवट बकाल, संग्रामपूर, धामणगाव, मरोड अशी बसची फेरी चालविल्या जाते.परंतु गत दोन ते तीन महिन्यापासून सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही वेळेत हि बसची फेरी येत नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागते. यासाठी पालकांनी जळगाव जामोद आगार प्रमुखांना दोन वेळा निवेदन देऊन समस्या मांडल्या आहेत. तरीही जळगाव जामोद आगाराकडून याकडे लक्ष देण्यात याले नाही, आज २८ नोव्हेंबर रोजी ७ वाजेपर्यंत मुली बसची वाट पाहत भर रस्त्यावर अंधारात उभ्या होत्या. तरीही बस आलेली नाही. म्हणून संतप्त मुलींनी शालेय दप्तरासह जळगाव जामोद ते वरवट बकाल रस्त्यावरच ठिय्या मांडला होता.