शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांकशुल्क अनुदान वित्त आयोगाच्या खात्यात

By admin | Updated: January 28, 2015 23:40 IST

बुलडाणा जिल्ह्यातील सागवण ग्रामपंचायतच्या १३ सदस्यांनी केली तक्रार.

बुलडाणा : सागवण ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक पी.बी. कानडजे यांनी मुद्रांक शुल्क निधी इतरत्र वळविला. हा निधी तत्काळ परत करावा अशी मागणी उपसरपंच शकुंतला उगले यांच्यासह ग्राम पंचायतीच्या १३ सदस्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात माहिती अशी की, सागवण ग्रामपंचायतीला सन २0१५ या आर्थीक वर्षात मुद्रांक शुल्क निधी सुमारे ३0 लाख रूपये प्राप्त झाले होते. मात्र सदर अनुदानाची रक्कम तत्कालीन ग्रामसेवक पी.बी. कानडजे यांनी १३ व्या वित्त आयोगाच्या खात्यामध्ये वर्ग करून घेतली. ही रक्कम १३ व्या वित्त आयोगाच्या खात्यात कशी वर्ग करण्यात आली याबाबत चौकशी करण्यात यावी. याशिवाय ग्रमसेवक पी.बी.कानडजे यांची बदली झाल्यानंतर त्यांनी सागवण ग्रामपंचायतीमध्ये नव्याने रूजू झालेले ग्रामसेवक टेकाळे यांच्याकडे रितसर पुर्ण पदभार सुपूर्द करायवयास हवा होता. मात्र कानडजे यांनी अर्धवट पदभार दिल्यामुळे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये नव्याने रूजू झालेले ग्रामसेवक टेकाळे यांना मागील जमाखर्च वाचून दाखविता आला नाही. कामकाज प्रोसीडींगमध्ये कोणते ठराव घेतले आहेत त्याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. यासर्व प्रकरणाच्या चौकशीची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.