भरधाव खासगी बसची एसटी बसला धडक, महिला ठार; दाेन जण जखमी

By संदीप वानखेडे | Published: May 4, 2024 03:06 PM2024-05-04T15:06:32+5:302024-05-04T15:07:02+5:30

नांद्रा धांडे फाट्याजवळ अपघात

Speeding private bus collides with ST bus woman killed Two people were injured | भरधाव खासगी बसची एसटी बसला धडक, महिला ठार; दाेन जण जखमी

भरधाव खासगी बसची एसटी बसला धडक, महिला ठार; दाेन जण जखमी

मेहकर : भरधाव खासगी बसने एसटी बसला जाेरदार धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली. तर दाेन जण जखमी झाले. ही घटना ४ मे राेजी नांद्रा धांडे फाट्याजवळ घडली. अंजली गोपाल शर्मा (वय २६, रा. चिखली) असे मृत महिलेचे नाव आहे.

अहमदपूर ते बुलढाणा बस (क्रमांक एमएच २० बीएल २३७७) ही मेहकरकडे येत हाेती. दरम्यान, नांद्रा धांडे फाट्याजवळ पाठीमागून भरधाव येणाऱ्या खासगी बस (क्रमांक एआर २०-९२००) ने एसटी बसला जाेरदार धडक दिली. या अपघातात अंजली सागर शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच एसटी बसमधील मुरलीधर नारायण इंगळे (वय ६७, रा.बुलढाणा) आणि खासगी बसमधील प्रवासी महादेव गोपाल उबाळे (रा. रिसोड, जिल्हा वाशिम) हे जखमी झाले आहेत. जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.

 घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ सहायक कार्यशाळा अधीक्षक राहुल देशमाने, एसटी निरीक्षक समाधान जुमडे, लिपिक प्रवीण तांगडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अपघातातील मृतकांच्या नातेवाईकास दहा हजार तर, जखमींना पाच हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली. यावेळी मेहकर पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार रमेश बाजड, हेड कॉन्स्टेबल शिवानंद केदार आणि पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन मदत केली. वृत्त लिहिस्ताेवर या प्रकरणी मेहकर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Web Title: Speeding private bus collides with ST bus woman killed Two people were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात