शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

११ व १८ ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम

By admin | Updated: October 1, 2015 00:16 IST

मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवाविण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश.

बुलडाणा : भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करणे, यादीवरील दावे व हरकती स्वीकारणे, मतदार यादीतील संबंधित भागाचे वाचन व नावांची खातरजमा करणे आदी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांंनी सहकार्य करावे आणि हा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी बुधवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रमाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी कुरुंदकर बोलत होते. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) रमेश घेवंदे तसेच विविध राजकीय पक्षांचे जिल्हाप्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमातंर्गत प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी ८ ऑक्टोबरला करण्यात येणार असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर या यादीवरील दावे व हरकती ७ नोव्हेंबरपर्यंंत स्वीकारण्यात येणार आहे. मतदार यादीमधील संबंधित भागाचे ग्रामसभा किंवा स्थानिक संस्था येथे वाचन आणि आरडब्ल्यूएसोबत बैठक १४ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. याच दिवशी नावांची खातरजमा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, या कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव दुरुस्त करणे, नाव वगळणे यासाठी विशेष मोहिमांचे आयोजनही करण्यात येणार आहे. या विशेष मोहिमा ११ व १८ ऑक्टोबर रोजी आयोजित होतील. त्याचप्रमाणे मतदार यादीवर आलेले दावे व हरकती ३0 नोव्हेंबरपर्यंंत निकालात काढावयाच्या आहेत. त्यानंतर २४ डिसेंबरपर्यंंत डाटा बेसचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी १६ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. राजकीय पक्षांनी सहकार्य करावे तसेच मतदारांनी आपले नाव बिनचूक असल्याची खातरजमा करावी, असे आवाहन त्यांनी केले.