शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर शिर्ला नेमाणे येथील दारूअड्डे उद्ध्वस्त

By admin | Updated: January 22, 2015 00:42 IST

गावक-यांच्या तक्रारीच पोलिसांनी घेतली दखल.

शिर्ला नेमाणे (जि. बुलडाणा) : तालुक्यातील शिर्ला नेमाणे गावात दारूबंदी करावी, यासाठी गावकर्‍यांनी केलेल्या तक्रारीची दखल पोलिसांना घ्यावी लागली. बुधवार, २१ जानेवारी रोजी पोलीस पथकाने गावात येऊन अवैध दारुविक्री करणार्‍यांचे साहित्य ताब्यात घेतले.शिर्ला नेमाणे गाव तसेच शिवारात मोठय़ा प्रमाणात अवैधरीत्या दारू गाळली जाते तसेच अवैधरीत्या दारूविक्री करण्यात येते. यामुळे गावात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले असून, अनेकांचे संसारात कटकटी निर्माण झाल्या आहेत. शिवाय यामुळे गावात भांडण-तंटे वाढले आहेत. याबाबत तंटामुक्त समितीने हिवरखेड पोलीस स्टेशनकडे गावातील अवैध दारू विकणार्‍यांचा बंदोबस्त करुन दाूरूबंदीची मागणी केली होती तसेच याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला. त्यामुळे हिवरखेडचे ठाणेदार अढावू यांनी आज २१ जानेवारी रोजी आपल्या ताफ्यासह शिर्ला नेमाणे येथे भेट दिली तसेच गावशिवारात नाल्याकाठी गाळल्या जाणार्‍या दारूअड्डय़ांचा शोध घेत दारूभट्टय़ा उद्ध्वस्त करून साहित्य जप्त केले तसेच डबे फोडण्यात आले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण ताले, बंडुबाप्पू देशमुख, अनिरुद्ध नेमाणे, सुधाकार नेमाणे, सरपंच मनीषाताई नारायण शिंदे यांच्यासह गावकरी तसेच महिला उपस्थित होत्या. पोलिसांनी गावात वचक निर्माण करून दारूबंदीची अंमलबजावणी नियमित ठेवावी, अशी मागणी यावेळी गावकर्‍यांनी ठाणेदार अढावू यांच्याकडे केली. * दारूविक्रेते हुशार गावातील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईसाठी पोलीस येत असल्याची भनक दारूविक्रेत्यांना लागली होती. त्यामुळे एकही दारूविक्रेत्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. दारूविक्रेते पोलिसांपेक्षाही हुशार झाल्याचे मत यावेळी गावकर्‍यांकडून व्यक्त होत होते.