शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय मान्यतेत अडकला शेगावचा आठवडी बाजार

By admin | Updated: January 28, 2015 23:36 IST

शेगाव विकास आराखड्यात समावेश; जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे प्रशासकीय मान्यता अद्दाप नाही.

फहीम देशमुख / शेगाव (बुलडाणा): शेगाव विकास आराखड्याअंतर्गत मंजुरात मिळालेल्या आठवडी बाजाराचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रखडला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शेगाव शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाने ५00 कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये शहरातील रस्ते, नाल्या, भुमिगत गटारी, प्रशासकीय कार्यालय, पोलिस ठाणे आदींचा समावेश आहे. यासोबत इतर भागाचाही विकास व्हावा यासाठी शासनाने शहरातील आठवडी बाजाराच्या विकासासाठी नगर पालिकेला परवानगी दिली आहे. मात्र यासाठी हा खर्च बांधा, वापरा आणि हस्तांतरत करा या धोरणांवर असल्याने यावर खर्च अपेक्षीत नाही.न.प.चे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी नगर पालिकेने सदर आठवडी बाजारात ७ कोटी रूपयांचे दुकाने, बाजार ओटे, मटन मार्केट, मच्छी मार्केट, कार पार्कींग, शौचालय, रस्ते, नाल्या आणि लाईट इत्यादी न.प.च्या विविध फंडातून तयार करून देण्याचा निर्णय २0 जून २0१४ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र.३ नुसार मान्यता देण्यात आली. व तशा प्रकारचे प्रस्ताव तज्ञांकडून तयार करून शासनाच्या सर्व अटी शर्तीनुसार आराखडा तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय मंजुरातीसाठी ६ ऑगस्ट २0१४ रोजी सादर केले. मात्र विकास आराखड्यातील इतर कामाप्रमाणे या कामालाही दप्तर दिरंगाईचा फटका बसलेला दिसत आहे.सदर प्रस्तावाची फाईल जिल्हा अधिकारी कार्यालयातील सामान्ये प्रशासन विभागाकडे धुळखात पडून आहे. एकीकडे विकास आराखड्यातील कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर हे सदैव प्रयत्नरत राहतात. त्यामुळे त्यांनी या परिपुर्ण प्रस्तावाला मान्यता बहाल केल्यास शहराच्या मध्यवर्ती असलेला आठवडी बाजाराचा विकास शक्य होईल. यासंदर्भात शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी टी. जी. मुल्लाणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आठवडी बाजाराचा परिपूर्ण प्रस्ताव नगर प्रशासन विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावासंदर्भात पालिकेकडून पाठपुरावा सुरू असून प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तत्काळ कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे सांगीतले.