शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलाचे ७० वर्षीय नराधमाकडून लैंगिक शोषण!

By admin | Updated: April 9, 2017 23:57 IST

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा)- तुळजापूर येथील ७० वर्षीय नराधमाने एका शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण केल्याची घटना ८ एप्रिल रोजी सायंकाळी घडली.

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : सिंदखेडराजा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या तुळजापूर येथील ७० वर्षीय नराधमाने एका शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण केल्याची घटना ८ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली व त्या वृद्धास चोप दिला. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. सिंदखेडराजा येथून जवळच असलेले तुळजापूर येथील इयत्ता पाचवीत शिकणारा मुलगा हा गावातील वाचनालयात पेपर वाचण्यासाठी गेला असता, तेथे काम करणाऱ्या ७० वर्षीय पंढरी नेहाजी मंडपे याची नजर त्या चिमुकल्या निरागस बालकावर पडली. तेथे कोणीही नसल्याचा फायदा घेऊन या नराधमाने वाचनालयाचा दरवाजा आतून बंद केला. काही समजण्याच्या आत त्याने मुलावर अनैसर्गिक कृत्य करणे सुरू केले. दरम्यान, वाचनालय परिसरात असलेल्या काही जणांना शंका आल्याने त्यांनी वाचनालयाकडे धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला.सदर कृत्य पाहून गावकऱ्यांनी त्यास बेदम चोप दिला. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सदर गैरकृत्य करणाऱ्या आरोपीवर बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार कलम ४ या अन्वये कलम ३७७/ ३ (ब) नुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपी वृद्धास जबर मारहाण झाल्यामुळे जखमी स्थितीमध्ये त्यास जालना येथे हलविण्यात आले.