बिबट्याचे पिलू आढळल्याने खळबळ!

By Admin | Updated: March 12, 2017 02:04 IST2017-03-12T02:04:04+5:302017-03-12T02:04:04+5:30

लोणार तालुक्यातील घटना; विहिरीतून बाहेर काढलेला बिबट झाला होता पसार.

Sensation of the leopard found! | बिबट्याचे पिलू आढळल्याने खळबळ!

बिबट्याचे पिलू आढळल्याने खळबळ!

लोणार(जि. बुलडाणा), दि. ११- तालुक्यातील पांग्रा डोळे शिवारातील विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिलास ग्रामस्थांनी बाहेर काढले. मात्र ते बिबट निसटून झाडीत लपल्यामुळे शनिवारी रात्री उशिरा एकच खळबळ उडाली. रात्री १0 वाजताच्या सुमारास बिबट्याच्या पिलाला पुन्हा पकडण्यात ग्रामस्थ वन विभागाच्या कर्मचार्‍यांना यश आले.
संध्याकाळच्या सुमारास शेतशिवार बिबट्याचे पिलू पडल्याचे शेतशिवारात काम करणार्‍या शेत मजूरांना दिसले. लगेच त्यांनी वन विभागाला याबाबत माहीती दिली. मात्र ग्रामस्थांनी वन कर्मचार्‍यांची वाट न बघता बिबट्याच्या पिलास बाहेर काढले. विहिरीतून बाहेर पडताच बिबट्याच्या पिलाने लगेच तेथून पळ काढला. रात्र झाल्यामुळे झुडपात लपलेल्या पिलास पकडणे कठीण झाले. दरम्यान तेथे पोहचलेल्या वन कर्मचार्‍यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पकडले. हा थरार तब्बल तीन तास सुरु होता.

Web Title: Sensation of the leopard found!