पती घरी नसताना घरी आला अन् शेजारी राहणाऱ्या विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 14:26 IST2022-03-06T14:21:58+5:302022-03-06T14:26:12+5:30

विवाहितेवर शेजाऱ्यानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आसीफ खान तय्युब खान हा पीडितेच्या ...

secretly came home and sexually abused the married woman living next door In buldhana | पती घरी नसताना घरी आला अन् शेजारी राहणाऱ्या विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला

पती घरी नसताना घरी आला अन् शेजारी राहणाऱ्या विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला

विवाहितेवर शेजाऱ्यानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आसीफ खान तय्युब खान हा पीडितेच्या घरासमोर बसत होता. यातच दोघांची ओळख होऊन त्यानंतर दोघे एकमेकांना फोनवर बोलत होते. त्यानंतर एक वर्षापूर्वी पीडित महिलेचे पती घरी नसताना आरोपीने घरात घुसून पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. तर याबाबत कुणाला काही सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर परत तो १५ ऑक्टोबर २०२१ रोजी पीडितेच्या घरात येऊन पुन्हा लैंगिक अत्याचार केला. सोबतच ८० हजार रुपयांची मागणी केली. माझी बिसी लागली की, तुला परत करतो असे तिला सांगितले. पैसे देण्यास पीडितेने नकार दिल्यावर बदनामी करण्याची धमकी दिली.

बदनामीला भीत महिलेने वेगवेगळ्या गटातून त्याला ८० हजार रुपये काढून दिले, परंतु जेव्हा पैसे मागण्याकरिता त्याला फोन केला तर तो फोन उचलत नव्हता, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. घडलेला प्रकार महिलाने पतीला सांगितल्यानंतर पतीने पीडित महिलेसह शहर पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश लोधी करीत आहेत. अद्याप आरोपीस अटक करण्यात आली नाही.

Web Title: secretly came home and sexually abused the married woman living next door In buldhana