शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
3
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
4
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
5
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
6
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
7
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
8
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
9
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
10
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
11
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
12
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
13
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
14
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
15
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
16
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
17
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
18
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
19
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
20
भारतीय रस्त्यावर धावणार १००% इथेनॉलवरील वाहने; सरकारने मांडला वाहन उत्सर्जन नियम बदल प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

योजना दोन कोटींची; पण नळाला दोन थेंब पाणी येईना... 

By विवेक चांदुरकर | Updated: July 13, 2024 15:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क घारोड : गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याकरिता दोन कोटी रुपये खर्च करून नळ योजना व पाण्याच्या टाकीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कघारोड : गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याकरिता दोन कोटी रुपये खर्च करून नळ योजना व पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र, सहा महिन्यांपासून गावात पाण्याचा एक थेंबही आला नाही. त्यामुळे नागरिकांना भर पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 

घारोड येथे गेल्या २२ नोव्हेंबर रोजी ‘जलजीवन मिशन’अंतर्गत नळयोजना व पाण्याची टाकी, असे दोन कोटी रुपयांच्या योजनेचे उद्घाटन मराठी पूर्व माध्यमिक शाळा घारोडजवळ मोठ्या थाटामाटात करण्यात आले; पण कामाच्या संथगतीने व गावपातळीवरील राजकीय फायद्यामुळे योजना रखडली. पुन्हा नव्याने ही योजना राबविण्यात सुरुवात झाली. निरोड व घारोड मधोमध धरणांमध्ये विहीर खोदली; पण पाणी न लागल्याने पुन्हा दुसरीकडे घारोड भागात विहिरीच्या कामाची सुरुवात करण्यात आली. पुन्हा अपयश आले त्या विहिरीला सुद्धा पाणी नाही लागले. त्यानंतर लाखनवाडा येथे रायधर धरणाच्या कुशीत तिसऱ्यांदा विहीर खोदण्यात आली. त्या विहिरीला पाणी लागले. मात्र, अद्याप नागरिकांना पाणी मिळाले नाही.

आता शेतीची कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना शेतातून १ किमीवरून पाणी आणावे लागत आहे. ‘जलजीवन मिशन’अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना गावांमध्ये पाइपलाइन करण्यात आली. ही नवीन नळ योजना जुन्या योजनेशी जोडून सुरू करण्यात आली. मात्र, वाॅर्ड नं. २ मध्ये ५० टक्के नळाला पाणी येत नाही.ग्रामपंचायतच्या ठरावाला केराची टोपलीग्रामपंचायतने ग्रामसभेत ठराव घेतला होता. कोणीही नागरिक नळाला मोटर लावणार नाही; पण नागरिकांनी ग्रामपंचायतचा ठरावाला केराची टोपली दाखवली आहे. सर्व नागरिक नळावर मोटर लावून पाणी भरत आहेत. परिणामी, ५० टक्के नागरिकांचा नळाला पाणी येत नाही. 

टॅग्स :Waterपाणी