शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

तीन टप्यात हाेणार सरपंचपदाची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:35 IST

बुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अनेक इच्छुकांना सरपंचपदाच्या निवडणुकीची प्रतीक्षा लागली हाेती. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केल्यानंतर ...

बुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अनेक इच्छुकांना सरपंचपदाच्या निवडणुकीची प्रतीक्षा लागली हाेती. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केल्यानंतर प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. तीन टप्यात सरपंचपदाची निवडणूक घेण्यात येणार असून ९, १० आणि ११ फेब्रुवारी राेजी हाेण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील सन २०२० ते २०२५ दरम्यान गठित हाेणाऱ्या ८७० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण तालुका स्तरावर जाहीर करण्यात आले आहे. तसेच महिला आरक्षण जिल्हास्तरावर जाहीर करण्यात आले आहे. सरपंचपदाच्या आरक्षणानंतर नुकत्याच निवडणुका झालेल्या ५२७ ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सदस्यांमध्ये सरपंचपदासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर काहींना धक्का बसला तर काहींना संधी मिळाली. महिला आरक्षणही जाहीर झाल्यानंतर आता सरपंचपदाचे चित्र स्पष्ट झाले आहे. सरपंचाची थेट निवडणूक रद्द करण्यात आल्याने यावेळी ग्रामपंचायत सदस्यांना माेठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे, अनेक गावातील नवनिर्वाचित सदस्य सहलीवर रवाना झाले आहेत. ज्या गावांमध्ये दाेन्ही पॅनलला समान जागा मिळाल्या तेथे सरपंचपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. बहुतांश गावांमध्ये चित्र स्पष्ट असल्याने तेथे सरपंच काेण हाेईल हे जवळपास स्पष्ट झाले आहे. माेठ्या ग्रामपंचायतींमध्ये काही ठिकाणी अपक्षांच्या हाती सत्तेची चावी आल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी असूनही आरक्षण निघालेला सदस्य नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे,अशा ठिकाणी बहुमत नसतानाही सरपंचपद मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण निघालेले एकमेव सदस्य असल्याने त्यांचा सरपंचपदाचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र आहे. काही गावांमध्ये आरक्षण निघालेले सदस्यच नसल्याने पेच निर्माण झाला आहे. प्रशासनाने सरपंचपदाची निवडणूक घेण्याची तयारी पूर्ण केली असून लवकरच तारखांची घाेषणा करण्यात येणार आहे.

तीन दिवस चालणार निवडणूक

ज्या तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींची संख्या जास्त आहे, त्या तालुक्यामध्ये ९, १० आणि ११ फेब्रुवारी राेजी निवडणूक हाेण्याची शक्यता आहे. तसेच नियाेजन करण्यात आले असून प्रशासनाकडून लवकरच अधिकृत तारखांची घाेषणा हाेणार आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी इच्छकांनी माेर्चेबांधणी केली आहे.

माेठ्या ग्रामपंचायतींवर राजकीय पक्षांचे लक्ष

जिल्ह्यातील १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचातींवर राजकीय पक्षांचे लक्ष राहणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. त्यामुळे, सरपंच निवडणुकीत काेणाला यश मिळते याकडे लक्ष लागले आहे.