शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘एन ९५’च्या नावाखाली बोगस मास्कची विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 11:58 IST

साध्या मास्कवरही ‘एन ९५’ नावाचा शिक्का मारून त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ‘एन ९५’ मास्क घेण्याकडे सर्वांचा कल आहे. या संधीचा फायदा काही विक्रेत्यांनी ‘एन ९५’च्या नावाखाली बोगस मास्कची विक्री सुरू केली आहे. दुकान बदलले की मास्कचे भावही बदलतात; त्यातही आपण खरेदी केलेला मास्क हा ‘एन ९५’ आहे का, याची शाश्वती अन्न व औषध प्रशासन तथा ग्राहक संरक्षण विभागाही देऊ शकत नसल्याचे चित्र आहे.कोरोना विषाणू संसर्गामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्यांवर प्रशासनाकडूनही कारवाईचे सत्र सुरू आहे. प्रत्येकजण मेडीकलमध्ये गेल्यानंतर ‘एन ९५’ मास्कची मागणी करतात. ‘एन ९५’ मास्कच्या वाढत्या मागणीमुळे व्यापाऱ्यांनी व इतर कंपन्यांनी या मास्कचे दर १०० रुपयांवर पोहचविले आहेत. २६ सप्टेंबर रोजी ‘लोकमत’ चमुने बुलडाणा शहरातील काही मेडीकलला व रस्त्यावरील मास्क विक्रीच्या दुकानांना भेट देऊन विक्रीची माहिती घेतली. त्यामध्ये प्रत्येक दुकानामध्ये मास्कचे दर वेगवेगळे दिसून आले. काही साध्या मास्कवरही ‘एन ९५’ नावाचा शिक्का मारून त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला. एका ठिकाणी तर कापडी मास्कच्या दरात एन ९५ मास्क मिळत असल्याचे दिसून आले.काय म्हणतात अधिकारी...अन्न औषध प्रशासन विभागाशी संपर्क केला असता ‘एन ९५’ मास्क आौषधीमध्ये येत नाही, त्यामुळे त्यासंदर्भात त्यांनाही अधिक माहिती नसल्याचे स्पष्ट केले.

मास्क विक्री संदर्भात आपल्याकडे कुठलीच कारवाई झालेली नाही. ते ग्राहक संरक्षण विभागाकडे येत नाही. नियमापेक्षा जादा दराने व्रिकी होत असल्यास त्यावर कारवाई होईल.-नी. रा. कांबळे, सहाय्यक नियंत्रक, ग्राहक संरक्षण विभाग बुलडाणा.

 

‘एन ९५’ ओळखायचा कसा?‘एन ९५’ नावाचा मास्क नेमका ओळखायचा कसा? हाच प्रश्न प्रत्येकाला आहे. याविषयी विक्रेत्यांना विचारले असता त्या मास्कवर ‘एन ९५’ असे लिहिलेले आहे, म्हणून तो ‘एन ९५’ आहे, असे सांगण्यात आले. दुकानावर मास्क खरेदी करणाºया ग्राहकांना विचारणा केली असता, दुकानदाराने दिला म्हणून घेतल्याचे सांगितले. अन्न औषध प्रशासन व ग्राहक संरक्षण विभागालाही याची माहिती नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या