शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आरएसएस व एमएसएस कधीही एकत्र येणार नाहीत

By admin | Updated: January 12, 2015 23:31 IST

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांचे स्पष्ट प्रतिपादन.

सिंदखेडराजा (बुलडाणा): मराठा सेवा संघाची (एमएसएस) भूमिका नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विरोधात राहिली आहे. त्यामुळे शिवधर्मपिठावर आरएसएसच्या तालमीत तयार झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीतीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असतानाच, आरएसएस व एमएसएस कधीही एकत्र येणार नाहीत, असे स्पष्ट प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी सोमवारी शिवधर्मपिठावर केले.जिजाऊ जन्मोत्सव सोहळय़ानिमित्त शिवधर्मपिठावर सोमवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात अँड. पुरूषोत्तम खेडेकर यांच्यासह शिवधर्म संसद सदस्या माजी आमदार रेखाताई खेडेकर, विजय कोकाटे, देवानंद कापसे, नेताजी गोरे, तसेच मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, हरियाणाचे प्रतिनिधी मांगीलाल चोपडे, कर्नाटकचे प्रतिनिधी डॉ. राठोड, दिल्लीचे प्रतिनिधी विवेकानंद विकार, झारखंडचे प्र ितनिधी उपेंद्रसिंग आदी उपस्थित होते.अँड. खेडेकर यांनी मराठा समाजाला काळानुरूप बदलण्याचे आवाहन केले. मराठा सेवा संघाच्या स्थापनेला यावर्षी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. या काळात सेवा संघाने प्रतिगामी शक्तीच्या विरोधात लढा दिला, तो आजही कायमच आहे. त्यामुळे कुणाच्याही मनात शंका नको. गत २५ वर्षांचा मागोवा घेतला असता समाजाने प्रगती केली, समाज संघटीत झाला, असे दिसते; मात्र बदलत्या काळानुसार समाजाने आणखी बदलण्याची गरज आहे, असे खेडेकर यांनी सीगितले. हे सर्व बदलण्यासाठी मी समाजाशी कठोर भाषेत बोललो, प्रसंगी शिव्या दिल्या; मात्र ती काळाची गरज हो ती. आता खूप बदल झाला आहे. डोके फोडून कुणीही राजा होत नाही. त्यामुळे मराठयांची कुटनिती वा परून आपल्याकडे संख्याबळ वाढवा. सत्ताकेंद्र ताब्यात घ्या, आपली भाषा ही समाजाला जोडणारी असावी. तंत्रज्ञानाची कास धरत अधिकाधिक ग्लोबल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.लैंगिक शिक्षणाचा पुरस्कार करतांना अँड. खेडेकर यांनी या शिक्षणाचा समावेश शिवधर्मामध्ये येऊ द्या, असे आवाहन शिवधर्म ससंद सदस्यांना केले. बदलत्या काळात आपल्या घरातील मुलामुलींना पालकांनीच योग्यवेळी माहिती दिली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. *हिंदी प्रदेशात ब्राम्हणवाद जास्त हिंदी भाषा बोलल्या जाणार्‍या प्रदेशात ब्राम्हणवाद मोठय़ा प्रमाणात आहे. विविध माध्यमांच्याद्वारे हा ब्राम्हणवाद घराघरात पोहचविले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हिंदी प्रदेशातून आलेल्या प्र ितनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी यावेळी सांगितले.*मराठेतर मुख्यमंत्र्यांचे कौतूकजिजाऊ सृष्टीवर आतापर्यंत केवळ सुधाकरराव नाईक व देवेंद्र फडणवीस हे दोनच मुख्यमंत्री आलेत. हे दोन्ही मुख्यमंत्री मराठेतर आहेत. मात्र त्यांनी येथे येऊन आपल्या चळवळीची पाठराखण केली, अशा शब्दात पुरूषोत्तम खेडेकर यांनी मराठेतर मुख्यमंत्र्याचे कौतूक केले.