बंद घरात आढळला कुजलेला मृतदेह
By admin | Published: March 29, 2016 02:18 AM2016-03-29T02:18:06+5:302016-03-29T02:18:06+5:30
खामगाव तालुक्यातील चितोडा येथील घटना.
![Rotten bodies found in house closed | बंद घरात आढळला कुजलेला मृतदेह Rotten bodies found in house closed | बंद घरात आढळला कुजलेला मृतदेह](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/default-image_201704447.jpg)
बंद घरात आढळला कुजलेला मृतदेह
खामगाव : बंद घरात डॉक्टरचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना तालुक्यातील चितोडा येथे घडली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
तालुक्यातील चितोडा येथे डॉ. सरफराज खान मजीद खान (५५) हे पत्नी व मुलीसह राहतात. दरम्यान, रविवारी त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजार्यांनी माहिती दिल्यावरुन त्यांचा भाऊ जमीर खान मजीद खान यांनी घरात जाऊन पाहिले असता डॉ.सरफराज खान यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मागील चार ते पाच दिवसांपासून डॉ. सरफराज यांची पत्नी मुलीसह माहेरी गेलेली असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर घटनेची माहिती खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनास्थळ पंचनामा केला व कुजलेल्या अवस्थेत शव ताब्यात घेऊन खामगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. डॉ.सरफराज यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण उघडकीस येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृतकाचा भाऊ जमीर खान यांच्या फिर्यादीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.