शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या कामात जेसीबीचा वापर!

By admin | Updated: January 7, 2017 20:55 IST

मजुरांना कामाची प्रतीक्षा कायम; नियमांना डावलून रोहयोची कामे.

बुलडाणा, दि. ७- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध कामे सुरू आहेत. परंतू या कामामध्ये रोजगरांचे वेतन काढून जेसीबीचा वापर केला जात असल्याचे वास्तव मेहकर तालुक्यातील ऊमरा, लोणी व पांगरखेड येथे सुरू असलेल्या रोहयोच्या कामातून समोर आले आहे. काही ठिकाणी रोहयोची कामे नियमांना डावलून होत असल्याने मजुरांना कामाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अधिनियम १९७७ नुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना व वैयक्तीक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना ते वास्तव करतात त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम मिळावे, असा उद्देश असतानांही सध्या रोहच्या कामांमध्ये उद्दशाला मात्र मुठमाती दिल्या जात आहे. रोहयोचे नियम धाब्यावर ठेवून ठेकेदारी पद्धतीने जिल्ह्यात सर्वत्र रोहयोची कामे सुरू आहेत. तसेच रोहयोच्या कामांचे मजूरांच्या नावावर पैसे काढून कामांमध्ये जेसीबीचा सर्रास वापर केला जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पांदण रस्ते व नाला खोलिकरण व रुंदीकरणाचे कामे सध्या सुरू आहेत. त्याचप्रमाणे मेहकर तालुक्यातील ऊमरा, मोळी व पांगरखेड येथे नाला खोलिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र रोहयोच्या कामाच्या ठिकाणी मजूरांचा वापर न करता जेसीबीचा वापर करून कामे केली जात आहेत. तसेच रोहयोच्या कामात मजूर दाखवून त्यांची मजूरी काढली जाते; प्रत्यक्षात मात्र ते मजूर इतर ठिकाणीच असतात. मेहकर तालुक्यातील ऊमरा, मोळी व पांगरखेड येथे नाला खोलिकरणाच्या कामात जेसीबीचा वापर होत असल्याची तक्रार लोणी गवळी येथील संजय जागृत यांनी तहसिलदारांकडे केली आहे. यासंदर्भात तात्काळ चौकशी करून कार्यवाही करावी, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशाराही संजय जागृत यांच्यासह काही नागरिकांनी दिला आहे.