शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशाला जोडणारा रस्ता धोकादायक

By admin | Updated: September 15, 2014 00:59 IST

सावधान : एकीकडून दरडीचा धोका तर दुसरीकडे दरी

जयदेव वानखडे / जळगाव जामोद महाराष्ट्राला मध्यप्रदेशासोबत जोडणारा बर्‍हाणपूर रस्ता जळगाव जामोद तालुक्यातून जातो; मात्र मध्यप्रदेशातील रस्त्याचे काम प्रगती पथावर असून, महाराष्ट्रातील काम गत तीन वर्षांपासून रखडले आहे. शिवाय अतिशय अरुंद रस्ता आणि कोसळलेल्या दरडी तसेच खालच्या बाजूला असलेल्या खोल दर्‍या- खोर्‍यांमुळे हा रस्ता वाहतुकीसह पर्यटकांसाठीही धोकादायक ठरत आहे.जळगाव जामोद तालुका येथून केवळ १६ किमी अंतरावर मध्यप्रदेशाची सीमा आहे आणि जळगावरून बर्‍हाणपूर अंतर केवळ ५८ किमी एवढे आहे. त्यामुळे या ठिकाणावरून बर्‍हाणपूर रस्ता व्हावा हे या भागातील लोकांची मागणी आहे; मात्र ही मागणी स्वप्नच राहते की काय, अशी स्थिती या रस्त्याची आहे. कारण हा मार्ग अतिशय निकृष्ट दर्जाचा बनलेला आहे. घाटामध्ये रस्त्यातील गिट्टी आपोआप वर आली, तर ज्या ठिकाणावरून पाण्याचा प्रवाह वाहतो त्या ठिकाणी बनवलेले सिमेंटचे धापे आणि रस्त्यांचे तुकडे उघडे पडले आहे. शिवाय सिमेंट रस्त्यासाठी टाकलेल्या लोखंडी जाळ्यावरून दिसत आहे.हा रस्ता वनक्षेत्रातून जात असल्याने वनविभाग आपली जमीन द्यायला तयार नाही. केवळ १0 फुटाचा रस्ता घाटात खालच्या बाजूने खचत जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी हा रस्ता अतिशय अरुंद आणि धोक्याचा बनला. धोक्याचा वळणावर तर खालचा भाग वाहून गेल्याने त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. वरच्या बाजूने उंच पहाड असल्याने जास्त पाऊस झाला की मुरुमाड माती कोसळते आणि रस्ता पूर्ण जाम होतो आणि तो वर्षभर तसाच राहतो ते ढिगारे हटविण्याचे कामही सार्वजनिक बांधकाम विभाग करत नाही.वनविभाग जागा देत नाही अशा परिस्थितीत आहे त्या स्थितीत रस्ता तयार झाला असून निधी उपलब्ध झाल्यावर त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात येईल, अशी प्रतिक्रीया सा.बां.विभागाचे उ पअभियंता ढोकणे यांनी दिली.