शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
7
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
8
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
9
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
10
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
11
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
12
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
13
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
14
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
15
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
16
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
17
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
18
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
19
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
20
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारप्रकरणी पुतण्या व काकूस १० वर्षांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2017 15:04 IST

बलात्कार करुन अल्पवयीने कुमारिकेवर मातृत्व लादणाºयासोबतच या गैरकृत्यासाठी आरोपीला सोबत देणारी त्याची काकू आ दोघांना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची दुहेरी शिक्षा सुनावली

खामगाव : अल्पवयीन कुमारिकेवर बलात्कार करुन मातृत्व लादणाऱ्या आरोपीसोबतच या गैरकृत्यासाठी आरोपीला सोबत देणारी त्याची काकू या दोघांना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची दुहेरी शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायालय क्रमांक १ चे व्हि.टी.सूर्यवंशी यांनी शुक्रवारी सुनावली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सातळी ता.जळगाव जा.येथील साडेपंधरा वर्षांची कुमारिकेला गत एप्रिल २०१४ मध्ये नात्याने काकू असणाऱ्या महिलेने घरी बोलाविल्यानंतर तेथे असलेल्या विशाल दगडू गवई (वय १८) याने तिच्यावर बलात्कार केला. तर यावेळी हजर असलेली तिची काकू हिने सुध्दा या गैरकृत्यासाठी प्रोत्साहित केले. या घटनेनंतर शेतात कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याचे सांगून पिडितेला स्वत:सोबत शेतात घेवून गेली होती. यावेळी आरोपी विशाल दगडू गवई याने शेतात येवून पिडितेवर पुन्हा बलात्कार केला होता. दरम्यान पिडितेची मासिक पाळी अनियमित झाल्याने तिला गावातील डॉक्टरला दाखविण्यात आले. मात्र फरक न पडल्याने शहरातील एका डॉक्टरकडे दाखवून सोनोग्राफी केली असता पिडित कुमारिका ५ ते ६ महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कुमारिकेवर ल ैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. ५ ते ६ महिन्याची गर्भवती असल्याने गर्भपात केल्यास जीवाला धोका असल्याने पिडित कुमारिकेस अकोला येथील चाईल्ड हेल्पलाईनमध्ये पाठविण्यात आले. येथे पिडितेने मुलीस जन्म दिल्यानंतर करण्यात आलेल्या डीएनए चाचणीमध्ये विशाल गवई हा दोषी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर याप्रकरणी १३ सप्टेंबर २०१४ रोजी पिडितेच्या आईने जळगाव जामोद पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी विशाल दगडू गवई व त्याची काकू सौ.रेखा शेषराव गवई दोघेही रा.सातळी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन आरोपी विशाल गवई यास अटक केली. तसेच याप्रकरणी जळगाव जामोद पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शेरकी व संदीप भोपळे यांनी तपास करुन प्रकरण खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायालय क्रमांक १ येथे न्यायप्रविष्ठ केले. याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी, डॉक्टर, तपास अधिकारी व इतर अशा १० जणांचे साक्षपुरावे घेण्यात आले. प्रकरणाचे सुनावणीमध्ये आरोपी विशाल दगडू गवई याचेविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने त्यास कलम ३७६ (२) भादंविनुसार १० वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ नुसार १० वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड दंड भरल्यास ३ महिने सश्रम कारावास अशी दुहेरी शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला गैरकृत्यास सोबत देणारी त्याची काकू सौ.रेखा शेषराव गवई हिला कलम १०९ सहकलम ३७६ भादंविनुसार १० वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ नुसार १० वर्षे सश्रम कारावास अशी दुहेरी शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रजनी बावस्कार (सौ.भालेराव) यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)