शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाचा विरोध आघाडीला भोवणार- मेटे

By admin | Updated: May 12, 2014 22:38 IST

विधानसभा निवडणुकीत शिवसंग्रामची उडी

खामगाव: राज्यात गेली साठ वर्ष मराठा नेत्यांनी राज्य केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी पदे उपभोगली. मात्र, मराठा समाजाच्या हिताचा कोणताही निर्णय घेतला नाही. मराठा आरक्षणालाही विरोध केला, त्यामुळेच आपण महायुतीशी कास धरल्याचे शिवसंग्राम या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी येथे स्पष्ट केले. नांदुरा रोडवरील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. मेटे म्हणाले की, मराठा समाजाच्या तथाकथीत नेत्यांनी समाजहिताकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मराठा समाजाची अवस्था वाईट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी मराठा आरक्षणाकडे कानाडोळा केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाताहत झाली असून ह्यराजकीय आत्महत्याह्ण टाळण्यासाठी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. शिवसंग्राम या सामाजिक संघटनेच्यामाध्यमातून समाजाच्या विविध समस्या सोडविण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे. समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून न्याय दिल्यामुळेच समाज आपल्या पाठीशी आहे. मराठा आरक्षणाच्या लढय़ात आपल्याला सर्वदूर पाठींबा मिळत आहे. समाजातील गरिबांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी ओबीसींमध्ये समावेश करून २५ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शिवसंग्राम सातत्याने करीत आहे. मात्र, याकडे सत्ताधार्‍यांकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. युती शासनाच्या काळात निर्माण झालेल्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडे राजकीय विरोधातून आघाडी शासनाने दुर्लक्ष चालविले आहे. गेल्या १५ वर्षांच्या काळात या मंडळाला शासनाने कोणतीही मदत केली नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. जाती-धर्मापेक्षा न्याय देणारा महत्वाचा असतो. त्यामुळेच आता आपण आपली चूक सुधारली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला. परंतु, विधानसभा निवडणुकीत महायुतीत शिवसंग्राम पक्ष रिंगणात उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील काही विधानसभेवर शिवसंग्रामचे उमेदवार उभे राहतील. मराठा आरक्षणाची चळवळ गतीमान करण्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांना एकत्र करून आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संपर्क सुरू आहे. या पत्र परिषदेला अकोला जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, बुलडाणा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, राजेंद्र मस्के, पवन शर्मा, रंगरावबापू देशमुख, सचिन देशमुख आदी उपस्थित होते. ** ..तर पहिल्याच अधिवेशनात समाजाला आरक्षण देवू गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात राज्य करणार्‍या आघाडी शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष चालविले आहे. आरक्षणाच्या विरोधामुळे जनता त्यांना आपली जागा दाखवून देणार असून राज्यात आघाडीचे पाणीपत होणार आहे. महायुतीचे उमेदवार तब्बल ३५ ठिकाणी विजयी होणार असल्याचे भाकितही त्यांनी यावेळी केले. आघाडी शासनाने आरक्षण न दिल्यास महायुतीची सत्ता आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.