शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

रेखाताई खेडेकरांच्या जीवनप्रवासावर आधारित 'जनरेखा' गौरवग्रंथाचे सोमवारी प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : चिखली मतदारसंघाच्या माजी आमदार रेखाताई खेडेकर यांची १२ एप्रिल रोजी एकसष्ठी आहे. त्यांच्या हीरकमहोत्सवी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : चिखली मतदारसंघाच्या माजी आमदार रेखाताई खेडेकर यांची १२ एप्रिल रोजी एकसष्ठी आहे. त्यांच्या हीरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या सर्वव्यापी कारकिर्दीवर आधारित जनरेखा या गौरवग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. या गौरवग्रंथाचे प्रकाशन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते तर खा. प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सायंकाळी ६ वाजता ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे.

कोरोनाच्या पार्श्व भूमीवर ऑनलाईन पद्धतीने पार पडणाऱ्या या गौरवगंथाच्या प्रकाशन सोहळ्यास आ. श्वेता महाले, संजय कुटे, संजय रायमुलकर, आकाश फुंडकर, संजय गायकवाड, राजेश एकडे, जि. प. अध्यक्षा मनीषा पवार, चिखलीच्या नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे, माजी आमदार बाबूराव पाटील, भारत बोंद्रे, राहुल बोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सुमारे चारशे पानांच्या जनरेखा या गौरवग्रंथात रेखाताई खेडेकर यांची १५ वर्षांची आमदारकी, त्यांचे मराठा सेवा संघात योगदान, कुटुंब आणि नातेवाईक यांच्या सुख-दु:खात पार पाडलेली जबाबदारी, एक सुसंस्कृत व खंबीर पत्नी म्हणून अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकरांना दिलेली खंबीर साथ या व इतर बाबतीतील सर्व माहितीचा अंर्तभाव या ग्रंथात करण्यात आला आहे. या गौरवग्रंथात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांचे शुभेच्छासंदेशही प्रकाशित करण्यात आले आहेत. गौरवग्रंथ आणि उपरोक्त कार्यक्रमासाठी पांडुरंग खेडेकर, पंडितराव देशमुख, सौरभ खेडेकर, कपिल खेडेकर, बाळासाहेब ठाकरे आदींनी मेहनत घेतली आहे.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने सहभागी व्हा !

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चिखली येथून जनरेखा गौरवग्रंथाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम फेसबुक लाईव्हद्वारे आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोणीही प्रत्यक्ष उपस्थित न राहता ऑनलाईन पद्धतीने असाल तेथून सहभागी व्हावे, प्रत्यक्ष भेट व उपस्थिती टाळावी, असे आवाहन जिजाऊसृष्टीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष सुभाषराव कोल्हे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विनोद बोरे यांच्यासह रेखाताई खेडेकर एकसष्ठी सत्कार व गौरवग्रंथ प्रकाशन समितीने केले आहे.

..............................