शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने रब्बीचे नुकसान

By admin | Updated: January 1, 2015 00:39 IST

बुलडाणा जिल्ह्यात वादळी वा-यासह पाऊस ; संग्रामपूर, नांदुरा तालुक्यासह काही भागात पडल्या गारा.

बुलडाणा : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. तापमानाचा पारा ८ अंशावर येऊन ठेपल्यामुळे जिल्ह्याला हुडहुडी भरली असताना बुधवारी पहाटे व दिवसभर जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वार्‍यासह, तर संग्रामपूर, नांदुरा तालुक्यासह काही भागात तुरळक गाराही पडल्याने थंडीचा कहर जिल्ह्यात कायम आहे. शिवाय अचानक आलेल्या या पावसामुळे रब्बीच्या हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान ८ अंश सेल्सियसवर आले. त्यामुळे जिल्ह्यात थंडीचा कहर झाला आहे. बरोबर असलेल्या ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांवर किडीचा प्रदुर्भाव झाला. या वातावरणात कडाड्याच्या थंडीबरोबरच बुधवारी पहाटे चार वाजता परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळी झालेला हा पाऊस सर्वदूर झाला. त्यानंतर बुधवारी दिवसभर जिह्यात ठिकठिकाणी या पावसाने हजेरी लावली. देऊळगावराजा, सिंदखेडराजा शहर व परिसरात पाऊस झाला. देऊळगावमही येथे तब्बल दोन तास वादळी वार्‍यासह पाऊस झाला. काही भागात तुरळक स्वरूपाच्या गाराही पडल्याची माहिती आहे. रुईखेड मायंबा, धाड, चांडोळ, डोमरूळ या परिसरातही पाऊस झाल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. संग्रामपूर पावसाबरोबर गारा पडल्या आहेत. यामुळे रब्बी पिकाची नासाडी झाल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. *चांडोळ येथे गारांचा पाऊस मंगळवारी ३0 डिसेंबर सायंकाळपासूनच आकाशात ढग जमा होऊन दुसर्‍या दिवशी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली होती. तर बुधवारी सायंकाळी या परिसरात अर्धा तास पाऊस झाला. या पावसाबरोबर हरभर्‍याएवढय़ा गाराही पडल्या. वादळी वारा, पाऊस आणि गारा पडल्याने शेतातील हरभरा, गहू आणि कांदा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. या आवकाळी पावसाने शेतकर्‍यांची एकच तारांबळ उडाली होती. अनेक शेतकर्‍यांच्या शेतात अद्याप सोयाबीनच्या सुड्या आहेत. बुधवारी सकाळी झालेल्या पावसाने काही शेतकर्‍यांचे सोयाबीनसुद्धा भिजल्याचे वृत्त आहे.