शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांची शिकार !

By admin | Updated: January 12, 2015 23:14 IST

सोनाळा परिसरातील वनक्षेत्रात राणडुकरांची शिकारीच्या वाढत्या घटना; वन्यजीव विभागाचे दुर्लक्ष.

सोनाळा (बुलडाणा) : परिसरातील वनक्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये शेकडो रानडुकरांची कत्तक झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, याकडे वन्यजीव विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. सोनाळा आणि सगोडा परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये जवळपास शंभरावर रानडुकरांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. परिसरात रानडुकरांच्या मासाची तस्करी करणार्‍या टोळी सक्रीय झाल्या आहेत. या टोळी सोनाळा येथून जवळच असलेल्या बोरखेड, सगोडा टुनकी वसाली परिसरात अवैध शिकार करतात. शिकारीसाठी सायंकाळी अंधाराचा फायदा घेतल्या जात असून रानडुकरांचा वावर असलेल्या भागात जमिनीच्या आत बारुदचे फटाके लावल्या जातात. या बारुदी फटाक्यांना खाद्यपदार्थाचे वेसन लावले असते. रात्रीच्या वेळी रानडुकर खाद्यपदार्थ शोधत जमिन उकरत राहते. दरम्यान, स्पंज बारुदचा स्फोट होवून डुकर हे जखमी अथवा जबडा फाटून ते मृत्यूमुखी देखील पडते. रानडुकराच्या मासाला मोठी किंमत असल्यामुळे शिकारी टोळींनी रानडुक्कर या वन्यजीवाला लक्ष्य केले आहे. रानडुकरासोबतच घोरपड, हरिण, रोही या प्राण्यांचीही शिकार वाढली आहे. उल्लेखनिय म्हणजे दिवसाढवळ्या शिकारी टोळी वन्यजीवांची शिकार करीत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यात वन्यजीव विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या शिकार्‍यांचे मनोबल उंचावले असून वन्यजीवांची शिकार करणे त्यांचा नित्यक्रम झाला आहे. सोनाळा ते टुनकी रोडलगतच वनविभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयात मोठय़ाप्रमाणात कर्मचारी देखील आहेत. मात्र, त्यांच्या डोळ्यादेखत वन्यजीवाची शिकार पोत्यात टाकून नेल्या जाते. त्यामुळे या सर्व प्रकाराला सर्वस्वी वनकर्मचारीच जबाबदार असल्याची ओरड परिसरातील वन्यजीव प्रेमींकडून होत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरट्या पध्दतीने शिकार होत आहे. याकडे वनविभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी वन्यजीव प्रेमीकडून होत आहे.