शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
2
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
3
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
5
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
6
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
7
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
8
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
9
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
10
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
11
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
12
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
13
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
14
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
15
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
16
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
17
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
18
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
19
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
20
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
Daily Top 2Weekly Top 5

पाऊसफुल्ल दिवस

By admin | Updated: September 21, 2016 06:30 IST

मोठ्या विश्रांतीनंतर गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी मुंबईकरांची त्रेधा उडवली.


मुंबई- मोठ्या विश्रांतीनंतर गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी मुंबईकरांची त्रेधा उडवली. पावसामुळे शहरात ३ घरांची पडझड होऊन २ जण जखमी झाले. मुसळधार पावसात समोरचे काहीच दिसत नसल्याने लोकलचा वेग मंदावला. अनेक स्थानकांतील इंडिकेटर्स बंद अथवा चुकीची वेळ दाखवत होते. चाकरमान्यांची आॅफिसला जाताना आणि घरी परतताना चांगलीच तारांबळ उडाली. मुंबईत वर्षाला सरासरी २३५ सेंटीमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत कुलाब्यात २०९ सेंटीमीटर तर सांताक्रुझ येथे २५१ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा यंदा कुलाबा येथे १४.४
तर सांताक्रुझ येथे ३७.७ सेंटीमीटर अधिक पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती वेधशाळेकडून
देण्यात आली. संध्याकाळपर्यंत शहर परिसर ४०.३९ मिलीमीटर, पूर्व उपनगर
६५.१५ मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात
८३.४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.यंदा वरुणराजाने कृपादृष्टी दाखवल्याने आजघडीला मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ९९ टक्के भरले आहेत. मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख
४७ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा अपेक्षित असताना, २० सप्टेंबर २०१५ रोजी तलावांमध्ये केवळ १० लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा होता. त्यामुळे मुंबईकरांना वर्षभर २० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. - आणखी वृत्त/२