शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

बुलडाणा  जिल्ह्यात आगामी चार दिवस सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 11:31 IST

Rain for next four days in Buldana district : चार दिवस जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा सार्वत्रिक स्वरूपातील पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : यंदाच्या पावसाळ्यातील सार्वत्रिक स्वरूपाचा पहिलाच पाऊस बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात झाला आहे. दरम्यान, आगामी चार दिवस जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा सार्वत्रिक स्वरूपातील पाऊस पडण्याची शक्यता असून, या पावसानंतरच शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने पेरणी करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असे जिल्हा कृषी हवामान केंद्राने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३४.६ मि.मी. पाऊस पडला असून, बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १६.५ मि.मी. पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा चिखली ३९.६ मि.मी., खामगाव ३५.२, मेहकर ३१, सि. राजा २३.२, नांदुरा २१.६ मि.मी., बुलडाणा ८.२ मि.मी. याप्रमाणे झाला आहे. शेगाव तालुक्याचा अपवाद वगळता अन्य १२ तालुक्यांत या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वार्षिक सरासरीच्या पाच टक्के पाऊस आतापर्यंत जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७६१.६ मि.मी. पाऊस पडतो.या पावसामुळे शेतकऱ्यांनी आता पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपती घेतली असून बी-बियाणे खरेदीसह पेरणीची पूर्वतयारी केली आहे. मात्र अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर्तास पेरणी करणे टाळावे, असे जिल्हा हवामान केंद्राने म्हटले आहे.दरम्यान, मुंबईत मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पुढील तीन दिवसांत विदर्भ व्यापण्यास मान्सूनला वेळ लागतो. त्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात १० जून ते १३ जूनदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे. हा पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने पेरणी करावी की नाही, याचा निर्णय घेता येईल, असे कृषी हवामानतज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात या वर्षी सात लाख ३८ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे.

पेरणी केव्हा करावी?साधारणत: ७५ मि. मी. ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर जमिनीमध्ये एक ते दीड फुटापर्यंत ओल येेते. ती आल्यासच शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचा निर्णय घ्यावा. या ओलाव्यातच बी रुजू शकते. अन्यथा जमिनीत टाकलेले बी सडण्याची शक्यता असते. तसे झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत पडलेल्या पावसाच्या भरोशावर पेरणी करणे टाळावे, असे मनेश यदुलवार यांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस