शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघातांची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST

१५ दिवसाआड पाणीपुरवठा, नागरिक त्रस्त बुलडाणा : शहरातील सुंदरखेड परिसरात १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना भीषण ...

१५ दिवसाआड पाणीपुरवठा, नागरिक त्रस्त

बुलडाणा : शहरातील सुंदरखेड परिसरात १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़. या परिसरात पाण्याचा दुसरा स्त्राेत नसल्याने आरओचे पाणी विकत आणावे लागत आहे़. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे़.

अपात्र रेशनकार्ड मोहीम स्थगित

बुलडाणा : राज्यातील अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. रेशनकार्ड शोधमोहिमेला अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त दुकानदार संघटनेने विरोध दर्शवला होता. त्यामुळे मोहीम स्थगित झाली.

भुईमुगाच्या पेऱ्यात दुपटीने वाढ

बुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात यावर्षी भुईमुगाच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. खामगाव तालुक्यात गतवर्षी २,७०० हेक्टर भुईमुगाचा पेरा होता. यावर्षी भुईमुगाचा पेरा साडेचार हजार हेक्टरवर पोहोचला आहे. त्यामुळे उत्पन्नात भर पडतेय.

चिखलीत उन्हाचा प्रकोप वाढला

चिखली : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम असतानाच, गत तीन-चार दिवसांपासून प्रखर उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना करताना शहरवासीय दिसून येतात.

गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करा

बुलडाणा : गुटखा विक्री करणे कायद्याने गुन्हा असतानाही बुलडाणा जिल्ह्यात ती सुरू आहे. ती बंद करण्याची मागणी रामेश्वर सोनकांबळे यांनी केली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत कोट्यवधी रुपयांचा गुटखा विकला जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

किनगाव जट्टू ग्रामपंंचायतीची स्वच्छतेकडे वाटचाल

किनगाव जट्टू : गावातील अस्वच्छता निकाली काढण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. नाली आणि कचऱ्याचे ढिगारे ग्रामपंचायत प्रशासनाकडून मोकळे केले जात आहेत. त्यामुळे किनगाव ग्रामपंचायतीची स्वच्छतेकडे वाटचाल सुरू केली आहे़

राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात घोळ

बुलडाणा : बुलडाणा ते वरवंड फाट्यापर्यंत ‘एनएच ७५३ ई’ या महामार्गाचे विस्तारिकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. त्यामुळे या निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी, तसेच निकृष्ट दर्जाचे काम नव्याने सुधारित करण्याची मागणी युवा सेनेकडून करण्यात आली आहे.

गर्दीवर नियंत्रणासाठी भरारी पथकाची गरज

बुलडाणा : गर्दीवर नियंत्रणाकरिता भरारीपथकाची आवश्यकता आहे. हे भरारीपथक पंचायत समिती गणनिहाय तयार करण्यात यावेत, या पथकामध्ये तलाठी, ग्रामसेवक, पोलीसपाटील, बीट जमदार असावेत, नगर परिषद हद्दीमध्ये भरारी पथकामध्ये नगरपालिका कर्मचारी, प्रतिनिधी, तलाठी, बीट जमदार असावेत.

चर्मरोगाने आजारी मोकाट कुत्र्यांंचा सुळसुळाट

जानेफळ : परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, चर्मरोगाने आजारी असलेल्या मोकाट कुत्र्यांंमुळे नागरिक तसेच लहान बालकांनासुद्धा चर्मरोगाचा त्रास होत असल्याने या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

५३ हजार मतदारांचे छायाचित्रच नाही!

बुलडाणा : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांचे छायाचित्र नाही, अशा मतदारांनी छायाचित्र जमा न केल्यास त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्यातील तब्बल ५३ हजार २२५ मतदारांचे छायाचित्रच नाही.

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत

लोणार : तालुक्यात १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीग्रस्त १७ लाभार्थींना ११ लाख २२ हजार ५०० रुपायांचे अनुदानाचे वाटप तहसीलदार सैपन नदाफ यांच्याहस्ते करण्यात आले. त्यामुळे आपत्तीग्रस्तांना दिलासा मिळाला आहे़.

विनापरवाना रेती वाहतूक जोरात

हिवरा आश्रम : परिसरात गत काही दिवसांपासून विनापरवाना रेती वाहतूक जोरात सुरू आहे. याकडे महसूल प्रशासनासोबतच पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.